Latur Assembly Election 2024 : अठरा हजार कोटी निधी आणल्याचा दावा, पण विकास दिसला का?
Latur Vidhan Sabha Election 2024 : लातूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत ६७.३ टक्के मतदान झाले, पण विकासकामांसाठी आणलेल्या अठरा हजार कोटींच्या निधीचा दाव्यानंतरही प्रत्यक्षात कामे दिसली नाहीत. चुरशीच्या लढतींमुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
लातूर : विधानसभेच्या लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत सरासरी ६७.३ टक्के मतदान झाले आहे. आता निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील एकाही मतदारसंघात एकतर्फी सामना झालेला नाही. सर्वच ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या आहेत.