Navaratri 2024 : नवरात्रोत्सवाच्या तोंडावर नारळ महागले; मागील आठवड्याच्या तुलनेत ५ रुपयांनी झाली वाढ

नवरात्रोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात नारळाला सर्वाधिक मागणी असते. मागील आठवड्याच्या तुलनेत नारळात ५ रुपयांची वाढ झाली आहे.
coconuts become expensive Navaratri festival  increase of Rs 5 household budget
coconuts become expensive Navaratri festival increase of Rs 5 household budgetsakal
Updated on

- विष्णू नाझरकर

जालना : नवरात्रोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात नारळाला सर्वाधिक मागणी असते. मागील आठवड्याच्या तुलनेत नारळात ५ रुपयांची वाढ झाली आहे. ऐन नवरात्री सणाच्या तोंडावर नारळाच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

गुजरात, पश्चिम बंगालसह महाराष्ट्रामध्येही मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. शारदीय नवरात्र हा सण दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला शुक्ल पक्षामध्ये येतो. आपल्याकडे मातीमध्ये वेगवेगळे धान्य टाकून त्यामध्ये नऊ दिवस मातीचे घट मांडून त्याची पूजा केली जाते. या घटात ठेवल्या जाणाऱ्या नारळाला अधिक महत्त्व असते.

यादरम्यान राज्यात मोठ्या संख्येने नारळाला मागणी असते. गणपतीच्या सणात नियंत्रणात असलेले नारळाचे दर मागच्या आठवड्यात ५ रुपयाने वाढले आहेत. पूर्वी किरकोळ बाजारात १८ ते २० रुपये असलेले नारळाचे दर आता २३ ते २५ रुपयांपर्यंत येऊन ठेपले आहेत. त्यामुळे अचानक वाढलेल्या दराने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

नवरात्रीत नारळाला अधिक महत्त्व

नारळाला श्रीफळ असेही म्हणतात. कारण की, आपण श्री हे भगवंताला उद्देशून म्हणतो. (उदा. श्रींचा प्रसाद, श्रींची आरती) तसेच श्रीफळ हे देवाचे फळ असल्याने त्याला श्रीफळ म्हटले जाते. नारळाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे तीन डोळे असतात. याचे प्रतीक म्हणून नारळाला पूजेसाठी अधिक महत्त्व आहे. नारळाला कल्पवृक्षही म्हटले जाते.

त्रिमूर्ती देव नारळात निवास करतात म्हणून त्याचे धार्मिक कार्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. घट म्हणजे कलश स्थापन करून त्यावर नारळ ठेवून देवीचे आवाहन करून केलेली पूजा म्हणजे घटस्थापना, अशी माहिती पंडित सुमीतशास्त्री कुलकर्णी यांनी दिली.

जिल्ह्याला महिनाभरात किमान ३०० टन नारळ लागतात. नवरात्रीच्या तोंडावर यांमध्ये काही प्रमाणात वाढ होते. गणपती सणात नारळाच्या किमती स्थिर होत्या. पण, आता त्यात वाढ झाली आहे. नवरात्रीच्या सणात नारळाच्या किमतीत काही प्रमाणात वाढ अपेक्षित असते. कारण या काळात मागणी जास्त असते. जालना बाजारपेठेत येणारे नारळ हे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून येतात.

— सचिन पंच, व्यापारी

नवरात्रीच्या उत्सवातच नारळाला सर्वाधिक मागणी असते. याच काळात पाच रुपयाने दर वाढले म्हणून सामान्य लोकांना महागाईची झळ बसणार आहे. फक्त हे दर नियंत्रणात कसे राहतील, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत.

— स्वाती गंगाधरे, गृहिणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()