पालम (जि.परभणी) : येथील नगरपंचायत निवडणुकीत पैसे वाटपाचा प्रकार समोर आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांसह सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पालम पोलिसांनी रविवारी (ता.१९) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कारवाई केली आहे. पालम (Palam) शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये मतदारांना पैसे वाटप होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यावरून उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकातील पोलिस नाईक ताजोदीन शेख आणि संभाजी शिंदे यांनी (Parbhani) हाके गल्लीतील बळीरा हाके यांच्या घरी छापा टाकला. तिथे मतदार यादीसह पैसे वाटप होत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. (code of conduct violation in palam, crime filed against ncp office bearers along with other parbhani news)
परंतु येथील लोकांना धक्काबुकी करून पोलिसांसोबत हुज्जत घातली. तेव्हा पोलिसांना धक्काबुकी करून शासकीय कामात अडथळा देखील आणला. शिवाय, घटनास्थळावरून लालखाँ पठाण आणि बापुराव कवडे पळून गेले. पोलिसांनी येथून २५ हजार व मतदार यादी जप्त केली आहे. तदनंतर सहायक अभियंता आकाश प्रकाश पौळ यांनी फिर्याद दिली. त्यावरून सात पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.