तुळजापूर : भाजप नेते तुषार भोसले यांच्यावर होणार कारवाई!

जिल्हाधिकारी तथा तुळजा भवानी मंदीर समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगांवकर यांनी उपविभागीय अधिकारी योगेश खरमटे यांना कारवाईचे आदेश दिले आहेत
tushar bhosale
tushar bhosalesakal news
Updated on

तुळजापूर : भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्यावर कारवाई होणार आहे. उपविभागीय अधिकारी योगेश खरमटे यांनी या माहितीस दुजोरा दिलेला आहे. तुळजाभवानी मातेचे नवरात्र गुरुवारी ता. 7 घटस्थापनेने सुरू झाले. मंदीरात भाविकांना सायंकाळी सहा वाजल्यापासून प्रवेश होता. भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले हे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दुपारी मंदीरात आले.

tushar bhosale
Drugs Case: आर्यन खानसह ८ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

तसेच विनामास्क फोटो सेशन ही त्यांनी केले. तसेच त्यांनी काही माध्यमांशी संवाद ही साधला. भोसले यांच्या समवेत भाजपचे काही कार्यकर्ते ही उपस्थित होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा तुळजा भवानी मंदीर समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगांवकर यांनी उपविभागीय अधिकारी योगेश खरमटे यांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

tushar bhosale
लखीमपूर घटनेबाबत खंबीर भूमिका घेतल्यानं राज्यात छापासत्र

यासंदर्भात उपविभागीय अधिकारी योगेश खरमटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सकाळ ला सांगितले की, जिल्हाधिकारी तथा तुळजा भवानी मंदीर समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगांवकर यांनी मला यासंदर्भात प्राधिकृत केले आहे. यासंदर्भात कारवाई होणार आहे. त्या दृष्टीकोनातुन प्रशासनाने कारवाई सुरू केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.