‘या’ जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ कामांना सुरवात 

file photo
file photo
Updated on

परभणी : परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या संकटामुळे आधीच हैरान असलेल्या नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. कडक उन्हाळा सुरु झाल्याने पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणीटंचाई सुरु झाल्याने जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यासाठी १५ गावात नविन विंधन विहीरसह ३८ गावात ताप्तुरती पुरक नळ योजना घेण्यास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मंजुरी दिली आहे.  नळ योजनेसाठी ९५ लाख ६८ हजार १०० रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

दरवर्षी परभणी जिल्ह्यात मार्च महिण्यापासून पाणीटंचाई उग्र होत असते. परभणी जिल्ह्यात पाणीटंचाई सातत्याने होत असते. जिंतूर, पूर्णा, गंगाखेड, पालम या तालुक्यांना सर्वाधीक झळ बसते. यंदा उशिरापपर्यंत पाऊस राहीला. त्यात सलग २२ दिवस अतिवृष्टी झाल्याने पाणीपातळी चांगली होती. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी महिण्यात टंचाई जानवली नाही. मार्च अखेरपर्यंत टंचाई नव्हती. परंतु एप्रिल सुरु झाला तेव्हापासून उष्णता वाढली आहे. त्यामुळे पाणीपातळी देखील खोल गेली आहे. त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागात टंचाई सुरु झाली आहे. टंचाईवर उपाय म्हणून दरवर्षी टॅंकर, विहीर अधिग्रहण, नविन विंधन घेणे, नळ दुरुस्ती करणे आदी कामे केली जातात.

१५ गावात १८ ठिकाणी नविन विंधन विहीरी
सध्या काही भागात टंचाई सुरु झाल्याने उपाययोजनाची कामे देखील सुरु करण्यात आली आहेत. सर्वत्र कोरोनाचे संकट आणि त्यात टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी भटकत आहेत. टंचाईवर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने तातडीने कामे सुरु केली आहेत. एकुण १५ गावात १८ ठिकाणी नविन विंधन विहीरी घेण्यास मंजुरी मिळाली आहे. एकुण १७ लाख ६६ हजार २५३ रुपयाची ही कामे आहेत. कान्हड (ता.सेलु), धोत्रा, वाई लासीना, हिवरा बु, बरबडी, देगाव, गोविंदपूर, आहेरवाडी, मरसुल, सोनखेड (ता.पूर्णा), कोल्हा, हतलवाडी, सावळी, करंजी (ता.मानवत), महातपुरी-आळंद (ता.परभणी) या गावात विंधन विहीरींची कामे होणार आहेत.

या गावात होणार नळ योजना
ताप्तुरती पुरक नळ योजना घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामध्ये बोरकिन्ही, राजा (ता.सेलु), बाभळगाव, टाकळगव्हाण (ता.पाथरी), सुप्पा, वागदरा तांडा (ता.गंगाखेड), पाळोदी, सोनुळा, पिंपळा, जंगमवाडी, मांडेवडगाव, मानवत रोड (ता.मानवत), मटकऱ्हाळा, मुरुंबा, जलालपूर, पाथरा, शिर्शी बु, जांब, माळसोन्ना (ता.परभणी), राजेगाव, गणपूर, कुऱ्हाडी, कौसडी मंगरुळतांडा, चिंचोली दराडे, नागनगाव, पोखर्णी तांडा, लिंबाळा, भोसी, महादेवनगर तांडा, करवली, बोरगळवाडी (ता.जिंतूर), दगडवाडी, मजलापूर, धानोरा मोत्या, भाटेगाव, माहेर, दस्तापूर (ता.पूर्णा) या गावांता समावेश आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.