Video: परभणीत १४ बटूंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा

file photo
file photo
Updated on

परभणी : दहा वर्षापासून येथील प्रमोद वाकोडकर मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सामुहिक व्रतबंध सोहळ्यात यंदा मंगळवारी (ता.२५) १४ बटूंवर संस्कार करण्यात आले. या सोहळ्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

दहा वर्षापासून प्रमोद वाकोडकर मित्रमंडळातर्फे हा उपक्रम सातत्याने राबविला जातो आहे. याहीवर्षी ता. २५ फेब्रुवारी रोजी हा सामुहिक व्रतबंध सोहळा एमआयडीसीतील व्यंकटेश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. सकाळी १० वाजून ५० मिनिटांला हा भव्य सोहळा हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडला. परभणी शहरासह जिल्ह्यातील आठ ही तालुक्यातील बटू व त्यांचे कुटूंबिय उपस्थित होते. जिल्ह्यातील आठ ही तालुकास्थानी स्थानिक प्रतिष्ठीत्यांच्या सहकार्यातून व वैदिक ब्राम्हणाच्या मंत्रोचारात हा नयनरम्य सोहळा संपन्न झाला.  या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा, जेष्ठ पत्रकार विजयराव जोशी, ब्राम्हण महासंघाचे जिल्हाध्यक्ष शंकर आजेगावकर, आदींची उपस्थिती होती.

नातेवाईकांची प्रचंड गर्दी
सामुहिक व्रतबंध सोहळा असल्याने व्यंकटेश मंगल कार्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती. सकाळी सर्व बटूंची सामुहिक वरात काढण्यात आली. त्यानंतर मातृभोजनही सामुहिक पध्दतीने करण्यात आले.

हेही वाचा ...

वालूरला ७० हजार क्विंटल कापुस खरेदी....

वालूर (जि.परभणी) : वालूर (ता. सेलू, जि.परभणी) येथील तिरुपती काॅटन इंडस्ट्रीज व जिनिंग प्रेसिंगमध्ये भारतीय कापूस निगमने (सी.सी.आय.) ने मंगळवारी (ता.२५) पर्यंत जवळपास ७० हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे.
सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेली वालूर गावात उपबाजारपेठ असून २००८ मध्ये श्री तोष्णिवाल  यांनी मोठे भागवंडल गुंतवणूक करून ग्रामीण भागात तिरुपती काॅटन इंडस्ट्रीज जिनिंग प्रेसिंगची स्थापना केली.
याच ठिकाणी आडीच वर्षांपूर्वी त्यांनी सुरू केलेल्या ऑईल मिल युनिटला प्रतिसाद मिळत आहे. या वर्षी या ठिकाणीच कापसाचा लिलाव होऊन चांगल्या प्रतिचा कापसास दर मिळत असल्याने आता पर्यंतची सर्वात जास्त म्हणजे जवळपास ७० हजार क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. या केंद्रावर मिळत असलेल्या सेवेमुळे वालूर व परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जिनिंग संचालक राजेंद्र तोष्णिवाल, रितेश तोष्णिवाल यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्थानिक सदस्य सुरेंद्र तोष्णिवाल, संजय साडेगावकर व भारतीय कापूस निगम लिमिटेडचे केंद्र प्रमुख निलेश लांजेवर यांनी पुढाकार घेतला आहे. फरदड व कचरा असलेला कापूस न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.