उदगीर (जि.लातूर) : अनेकांनी काँग्रेस संपवण्याची भाषा केली. काँग्रेस (Congress Party) कधीच संपली नाही बोलणारे संपले. पण काँग्रेस कधीही संपणार नाही. काँग्रेस म्हणजे बीएसएनएलचे टाॅवर आहे. काही जण नेटवर्क मिळत नाही म्हणून सिम बदलत राहतात. परंतु त्यांच्या तारा बीएसएनएललाच कनेक्ट आहेत. आम्ही कुणाचा काटा काढायला येत नाही. पक्षादेश जे आहे ते करत राहणार असे मत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख (MLA Dhiraj Deshmukh) यांनी येथील व्यक्त केले. येथील (Udgir) रघुकुल मंगल कार्यालयात बुधवारी (ता.सहा) आयोजित कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, प्रदेश सरचिटणीस अभय साळुंके, बाजार (Latur) समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, विजय देशमुख, शहराध्यक्ष मंजूर पठाण, रामराव बिरादार, प्रा. रामकिशन सोनकांबळे, शिवकुमार हसरगुंडे, प्रीती भोसले, विजय निटूरे, उपसभापती बाळासाहेब मर्ल्लापले, मारोती पांडे, सोपानराव ढगे, सलीम शेख, शिवाजी देवणाळे, शीला पाटील, उषा कांबळे, सरोजा बिरादार, विनोद सुडे, अमोल कांडगीरे, नाना ढगे, अभिजित साकोळकर, माधव पाटील, गोटु बिरादार आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी आमदार देशमुख म्हणाले, महाविकास आघाडी सरकार हे राज्याचं हित लक्षात घेऊन सोनिया गांधी यांच्या परवानगीने कॉमन मिनिमाम प्रोग्राम नुसार स्थापन झालं आहे. जबादारीने सामान्य लोकांचे काम करत आहोत. येणाऱ्या काळातील निवडणुका पक्ष आदेशाप्रमाणे काँग्रेसच्या झेंड्याखाली सर्व ताकतीने, निष्ठेने लढाव्याच्या आहेत. कार्यकर्त्यांनी न डगमगता उदगीर पालिकेवर एकहाती काँग्रेसची सत्ता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा काटा काढण्यासाठी ते आले होते. अशा चर्चांना उधाण आले होते आहे. हा धागा पकडून आमदार देशमुखी यानी आम्ही कुणाचा काटा काढायचा येत नसतो. पक्षादेशाप्रमाणे काम करतो असे उद्गार काढले. यावेळी सभापती श्री.पाटील म्हणाले, पालकमंत्र्यांनी उदगीरमध्ये पक्षाचे धोरण जाहीर केले. शहराचा विकास चंद्रशेखर भोसले व राजेश्वर निटूरे यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षात विकास थांबला आहे. भाजपाच्या लोकांनी केलं काय ? गार्डनच्या जागा विकून टाकले, देशमुख कुटुंबाने संजय बनसोडे यांना विजयी करून आघाडी धर्म पाळला. कार्यकर्त्यांना दिलेल्या कामात ३० ते ३२ टक्के रक्कम थांबून ठेवली आहे. येत्या निवडणुकीत नगर परिषद ताब्यात घेतली पाहिजे. बाजार समितीचे उत्पन्न दोन कोटीवरून सात कोटींवर नेले आहे. जे गेले त्यांना जाऊद्या पण एकदिलाने काम करून येणाऱ्या निवडणूका जिंकायचे आहेत. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री. पाटील म्हणाले काँग्रेस मजबूत ठेवण्याचं काम आम्ही केलं आहे. त्यामुळे उदगीरमध्ये पालिका काँग्रेसच्या ताब्यात येणार आहे. आजपर्यंत येथील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस सोबत कायम आहेत. पण आता धीरज देशमुख यांनी उदगीर पालिका निवडणुकीत उदगीर प्रभारी म्हणून सूत्रे हातात घ्यावी. काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व आहे. या जिल्हाची चावी पालकमंत्री यांच्या हातात आहे. यावेळी श्री.निटूरे म्हणाले की, उदगीरला काँग्रेस शिवाय पर्याय नाही. गेल्या निवडणुकीत भाजपाकडे उमेदवार नव्हता. काँग्रेसमधील लोक भाजपने घेऊन निवडणूक लढ्वली होती. अमित देशमुख व धीरज देशमुख यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. उदगीरचा विकास करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.
तर धोबीपाचाड केल्याशिवाय सोडू नका....
काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जे ठरवेल तेच उदगीरमध्ये होणार समाजात उगवत्या सूर्याला नमस्कार असतो. मंदिराच्या कळसाला नमस्कार करण्यात येतो. पण खालचा पाया सरकल्यावर कळस कुठंही दिसणार नाही. निर्णय निश्चय करून निडरपणे तयार रहा. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी उदगीरमध्ये राहणार. या मतदारसंघात काँग्रेस पक्षची ताकद वाढवायची आहे हा पक्षाचा आदेश आहे. पण अन्याय कधीही सहन करणार नाही. आमचं सरळ असून हाथीसारखी चाल सुरू आहे. पण समोरचा वाकडं चालत असेल तर धोबीपाचाड केल्याशिवाय सोडू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.