गेल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. सर्वच तालुक्यात सोयाबीनसह इतर खरीपाची पिके उगवली आहेत.
उस्मानाबाद : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस Rain चांगली हजेरी लावत असल्याने खरीप पिकांना पोषक वातावरण तयार झाले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बहुतांश शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणी पूर्ण केली. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम चांगला होईल, असा अंदजा शेतकरी वर्गातून वर्तविला जात आहे. जिल्ह्यात Osmanabad यंदाच्या वर्षात पाऊस समाधानकारक हजेरी लावित आहे. मृग नक्षत्रातच पेरणी व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. गेल्या वर्षीही मृग नक्षत्रात पाऊस झाला होता. यंदाही मृगामध्ये पाऊस होताच शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली. आतापर्यंत 80 टक्के पेरणी पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राला Mrug Nakshatra सुरुवात झाली. सुरुवातीला जेमतेम पाऊस झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने चांगला पाऊस होत आहे. गेल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. सर्वच तालुक्यात सोयाबीनसह Soybean इतर खरीपाची पिके उगवली आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. जिल्ह्यात सर्वदूर कमी-जास्त पाऊस असला तरी खरीपांच्या पिकांना Kharip Crop यामुळे चांगला फायदा होत आहे.continue two days rainfall in osmanabad district
उगवण क्षमता वाढणार
काही तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. अशा ठिकाणची पिकांची चांगली उगवण झाली आहे. पिके चांगल्या स्थितीत आहेत. मृग नक्षत्रात पेरणी होण्याचे अनेक फायदे आहेत. पिके जोमदार येतात. शिवाय किडीचाही फारसा प्रादुर्भाव दिसत नाही. परिणामी उत्पन्न वाढते. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
सोयाबीनला फायदा, पण दर....
यंदा सोयाबीनला विक्रमी भाव मिळाला आहे. तब्बल तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल मिळणारा भाव यंदा प्रथमच आठ हजाराच्याही पुढे गेला होता. जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असतो. यंदा भाववाढ झाल्याने त्यात सोयाबीनचा पेराही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही समाधानकारक पाऊस होऊन सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळेल, अशा अपेक्षा आहे. मात्र सोयाबीनचे भाव स्थिर राहणार का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. असे असले तरीही किमान पाच हजार रुपयांच्या खाली भाव येणार नाही, अशा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. मात्र सोयाबीनचे दर आंतरराष्ट्रीय उत्पन्नावर अवलंबून असतात. त्यामुळे अंदाज लावणेही कठीण असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान सध्या झालेल्या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गात समाधन व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.