धक्कादायक ! वादग्रस्त सुदाम मुंडेने पुन्हा दवाखाना सुरु केला, चक्क दोन महिलांचे गर्भही केले गायब.

dr sudham munde.jpg
dr sudham munde.jpg
Updated on

परळी वैजनाथ (बीड) : गर्भपात प्रकरणातील आरोपी सुदाम मुंडे यांची वैद्यकीय क्षेत्रातील पदवी रद्द केलेली असताना शहरापासून जवळच असलेल्या नंदागौळ रस्त्यावरील रामनगर परिसरात मुलीच्या नावावर खाजगी दवाखाना सुरू करुन पेशंटची तपासणी करून फसवणूक केल्या प्रकरणी व तपासणी पथकास दमदाटी प्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात रविवारी (ता.०६) गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुढील तपासणी करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन महिलांचे गर्भ गायब झाल्याची माहिती मिळाली आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
               
येथील पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्र धर्मापुरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब शिवाजीराव मेढे यांच्या फिर्यादी वरुन अवैध दवाखाना सुरू केल्याप्रकरणी सुदाम मुंडे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये अधिक चौकशी करण्यासाठी सुरुवातीला ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. ती संपल्यानंतर शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता मंगळवार (ता.१५) पर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ही तपासणी करत असताना तीन महिलांपैकी दोन महिलांचे गर्भ गायब असल्याचे तपासणी मध्ये उघड झाले आहे.

या अगोदरही स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणात ४ वर्षाची कैद सुनावण्यात आली होती. पूर्वी येथील बसस्थानकासमोर असलेल्या दवाखान्यात या क्रुर्रकर्मा सुदाम मुंडे मोठ्या प्रमाणावर महिलांचे गर्भपात करत असे. तसेच गर्भपात केल्यानंतर हे गर्भ शहरापासून जवळ असलेल्या त्याच्या शेतात तो खड्डे करुन त्यित पुरले जात असत, तसेच त्याच्या कडे असलेल्या दोन श्वानांना तो गर्भ खाण्यासाठी टाकत असे. यासर्व कारणामुळे हे स्त्रीभ्रूणहत्या चे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते. नाशिक कारागृहात काही वर्ष शिक्षा भोगल्यानंतर एक वर्षापूर्वी त्याची त्याची जामिनावर सुटका झाली होती. 

सुटका झाल्यानंतर पुन्हा परळी पासून जवळच असलेल्या रामनगर परिसरातील शेतात पुन्हा वैद्यकीय पदवी निलंबित असताना खाजगी वैद्यकीय व्यवसाय अवैधरित्या सुरू करण्यात आला होता. काही नागरिकांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी एक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक तयार करून छापा टाकला असता खाजगी दवाखाना व गर्भपातासाठी लागणारे साहित्य, औषधी आढळून आली होती. याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपासात त्याच्या अवैध दवाखान्यात उपचार घेत असलेल्या महिलांची चौकशी केली असता या महिलांचे गर्भ गायब झाल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी उप अधिक्षक 
राहूल धस हे पुढील तपास करत आहेत. न्यायालयाने १५ सप्टेंबर पर्यंत सुदाम मुंडेला पोलीस कोठडी सुनावणी आहे.
 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.