दिलासादायक! लोहारा तालुक्यातील १८ गावे झाली कोरोनामुक्त

आतापर्यंत तालुक्यात तीन हजार ४०० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आली आहेत
covid 19
covid 19covid 19
Updated on

लोहारा (जि.उस्मानाबाद): कोरोना संसर्गाच्या (covid 19 infection) दुसऱ्या लाटेने उग्ररूप धारन केल्याने तालुक्यात गंभीर स्थिती आहे. परंतु आरोग्य यंत्रणेने प्रभावीपणे प्रतिबंधात्मक केलेल्या उपाययोजनेमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. बुधवार (ता.नऊ) अखेरपर्यंत तालुक्यातील १८ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. कोरोना संसर्गच्या पहिल्या लाटेचा तालुक्यात फारसा प्रभाव पडला नव्हता.परंतु दुसऱ्या लाटेने उग्ररूप धारण केल्याने तालुक्यातील स्थिती गंभीर झाली. दुसऱ्या लाटेत जवळपास ६० जणांचा कोरोनाने बळी घेतला.

परिस्थिती भयावह असल्याने नागरिकांची झोप उडाली. परंतु अशा कठीण परिस्थितीत आरोग्य विभागाने कमालीची दक्षता घेत कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर भर दिला. कोरोना टेस्ट वाढविणे, लसीकरण करणे, जनजागृती करणे, विलगीकरण कक्ष वाढवून बाधितांवर वेळीच उपचार करणे यामुळे सध्या कोरोना संसर्ग आटोक्यात येत आहे. आतापर्यंत तालुक्यातील १७ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तर भोसगा, जेवळी (दक्षिण), माळेगा मार्डी नागूर उदतपूर या गावात प्रत्येकी एक बाधित रूग्ण आहेत. काही दिवसात हेही गावे कोरोनामुक्त होणार असून त्यासाठी आरोग्य विभाग, आशा कार्यकर्ती विशेष प्रयत्न करीत आहेत. तालुक्यात सर्वाधिक ७६ रूग्ण एकट्या एकोंडी गावात असून ते उचार घेत आहेत. त्या खालोखाल धानुरी ३५, लोहारा २४, जेवळी १५, कानेगाव १५, करवंजी ११ सास्तूर १० रूग्ण ऍक्टीव्ह आहेत.

covid 19
औरंगाबाद - सोलापूर महामार्गावर ओव्हरटेक करताना दुचाकीस्वार ठार

आतापर्यंत तालुक्यात तीन हजार ४०० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आली आहेत. यात लोहारा शहरातील ५४९, ग्रामीण भागातील दोन हजार ८५१ रूग्णांचा समावेश आहे. यापैकी तीन हजार ९८ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर जवळपास ७० रूग्ण कोरोनाने दगावली आहेत. सध्या २६९ रूग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनामुक्त झालेली गावे-

बेलवाडी, बेंडकाळ, काटेचिंचोली, रेबेचिंचोली, दस्तापूर, फणेपूर, होळी, करजगाव, कास्ती (खुर्द), कोंडजीगड, लोहारा (खुर्द), मोघा (बुद्रुक), मोघा (खुर्द), राजेगाव, रूद्रवाडी, शिवकरवाडी, उंडरगाव ही सतरा गावे कोरोनामुक्त झाली आहेत. येथील नागरिकांनी घेतलेली खबरदारी आणि आरोग्य विभागाने केलेले प्रभावी उपाययोजनामुळे या गावांनी कोरोनावर मात केली आहे.

covid 19
Covid 19: मराठवाड्यातील प्रसार होतोय कमी; नवीन रुग्ण सातशेच्या आत

सध्या तालुक्यातील १८ गावे कोरोनामुक्त झाल्याचे आशादायक चित्र आहे. संपूर्ण तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करणे, जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेणे तसेच कोरोन तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

डॉ. अशोक कटारे, तालुका आरोग्य अधिकारी, लोहारा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()