Corona Breaking ; परभणी जिल्ह्यात आठ रुग्णांची भर 

corona
corona
Updated on

परभणी ः जिल्ह्याचे कोरोना मिटर अत्यंत वेगाने फिरत आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यातच बुधवारी (ता.आठ) जिल्ह्यात नवे आठ कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने जिल्ह्यावासियांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

मंगळवारी जिल्ह्यात सात रुग्ण आढळून आले होते. त्यापाठोपाठ बुधवारी या रुग्णांमध्ये नव्या आठ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १६२ झाली आहे. बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये गंगाखेड शहरातील पूजा मंगल कार्यालय, वकील कॉलनी येथे तीन रुग्ण आढळून आले आहेत. परभणी तालुक्यातील करडगाव येथे दोन तर शहापूर येथे एक रुग्ण आढळलेला आहे. सेलू शहरातील शास्त्री नगरमध्ये एक तर परभणी शहरातील कडबी मंडी परिसरात एक रुग्ण आढळला आहे. 

गंगाखेड शहराची चिंता वाढली 
गंगाखेड : तालुक्यातील सेलमोहा येथील एक महिला व शहरातील पूजा मंगल कार्यालय परिसरातील एक महिला अशा तालुक्यातील दोन महिलाचे रिपोर्ट (ता.सहा) जुलै मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर या महिलांच्या संपर्कातील ६३ व्यक्तींना कॉरंटाइन करून या व्यक्तींचे स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले असता यापैकी एक महिला व दोन पुरुष असे एकूण तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी (ता. सहा) सेलमोहा येथे एक महिला व पूजा मंगल कार्यालय परिसरातील महिला महिलांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते.  या दोन महिलांच्या संपर्कातील ६३ व्यक्तींना क्वॉरन्टाइन केले होते. त्यातील तीन कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

पाच जणांना घरी सोडले 
बुधवारी (ता.आठ) जिल्ह्यातील पाच कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यात झरी (ता.परभणी) येथील एक महिला व दोन पुरुष, पाथरा (ता.परभणी) येथील एक पुरुष व जांब (ता.परभणी) येथील एका महिलेचा समावेश आहे. 

पाच दिवसांत सात कोरोना बाधित, सेलूची चिंता वाढली 
 सेलू : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्णाच्या संख्येत वाढ होत असून चार दिवसांत सात नवीन कोरोनोचे रुग्ण आढळून आले. तालुक्यात हा चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा तालुक्याचा आकडा सोळावर गेला आहे. 
शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागातील शनिवारी (ता.चार) - एक, रविवारी (ता.पाच)-एक, मंगळवारी (ता.सात) - चार व बुधवारी (ता.एक)- एक या दिवसात सात व्यक्तींचे कोरोना बाधित अहवाल आहे. कोरोना बाधित चार रुग्ण परभणीला तर तीन रुग्ण सेलू उपजिल्ह्याच्या तहसील रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील केअर सेंटरमध्ये वैद्यकीय निगरानीखाली औषधोपचार घेत आहेत. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे मंगळवारी (ता.सात) -१५ व बुधवारी (ता.आठ) - २४ अशा एकूण ३९ व्यक्तींचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असून या सर्वांचे अहवाल मिळाल्यानंतरच स्पष्टता लक्षात येईल, अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. 

परभणी कोरोना मिटर
-----------------------
एकूण पॉझिटिव्ह - १६२
उपचार सुरू - ५१
बरे झालेले - १०७
एकूण मृत्यू - चार 
आजचे पॉझिटिव्ह - आठ
आजचे मृत्यू - शून्य 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.