परभणीः परभणी शहरातील दादाराव प्लॉट येथील एका १५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. तर दिवसभरात ७० बाधित रुग्ण आढळले. एकूण मृतांची संख्या ९१ इतकी झाली आहे.
परभणी महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (ता. २१) १५ केंद्रांवर ३४५ व्यापाऱ्यांच्या घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये सहाजण पॉझिटिव्ह आढळून आले.
हेही वाचा - लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज
शहरातील विक्रेत्यांना रविवारपर्यंत रॅपिड टेस्ट करण्याचे आवाहन
परभणी ः शहरातील व्यापारी, विक्रेते आदींनी रविवार (ता.२३) पर्यंत स्वतःच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करून घ्याव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे. शहरातील भाजीविक्रेते, पथविक्रेते, मटण विक्रेते, किराणा दुकानदार, व्यापारी आदींना जुलै महिन्याच्या अखेरपासून रॅपिड अँटीजेन टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले आहे; परंतु व्यापारी वर्गातून त्यास फारसा प्रतिसाद मिळत नाही म्हणून (ता.१५) ऑगस्टपर्यंतची रॅपिड टेस्टची मुदत दिली होती. त्यानंतर ती वाढवून ता.१७ करण्यात आली होती; परंतु त्यानंतर देखील महापालिकेने फारसी कठोर भूमिका न घेता, रॅपिड टेस्ट सुरूच ठेवल्या होत्या. गुरुवारी ता.२० तर १५ केंद्रावर फक्त ५५७ जणांच्या टेस्ट झाल्या. महापालिकेची पथके गेल्या दोन दिवसांपासून विक्रेते, दुकानदार यांच्याकडे जाऊन रॅपिड टेस्ट केली का नाही, याचा आढावा घेत आहेत. केली असेल तर प्रमाणपत्राची पाहणी करीत असून न केल्यास तत्काळ करून घेण्याच्या सूचना देत आहेत. आयुक्त देविदास पवार यांनी मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षकांना देखील सूचना दिल्या आहेत. टेस्ट करून न घेतल्यास ता.२४ ऑगस्टपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येणार नाही, अशी सूचना सर्व व्यापारी संघटनांना द्यावी, अशी सूचना दिल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी दिली.
जिंतुरात अकरा पॉझिटिव्ह
जिंतूर ः शुक्रवारी (ता. २१) शहरात ४१ व्यापारी, नागरिक यांची रॅपिड अॅंटीजेन टेस्ट घेण्यात आली. त्यात अकराजण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये काल पॉझिटिव्ह आढळून आलेले पोलिस निरीक्षक यांच्या संपर्कात आलेले ६४ वर्षीय पुरुष आणि ५७ व २३ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. इटोलीकर गल्लीमधील व्यापाऱ्याच्या संपर्कातील एक ५५ वर्षीय पुरुष, शिवाजीनगरातील व्यापाऱ्याच्या संपर्कातील ५१ वर्षीय पुरुष, ४२ आणि ४३ वर्षीय महिला, तर हुतात्मा स्मारक परिसरातील व्यापाऱ्यांच्या संपर्कात आलेले ६३ व २९ वर्षीय महिला आणि १२ व १० मुले यांचा समावेश आहे.
संपादन ः राजन मंगरुळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.