जालन्यात कोरोनाच्या विळख्यातून आठजण बरे 

संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र.
Updated on

जालना - कोरोना बाधित रूग्णांची सातत्याने भर पडत असताना पुन्हा एका साठ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर गुरूवारी (ता.दोन) सकाळी तब्बल ३९ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याला मोठा धक्का बसला असून बाधितांचा आकडा आता सहाशे पार झाला आहे. दरम्यान कोविड हॉस्पिटलमधील आठ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

मंगळवारी सकाळी सलग दोन आणि बुधवारी तीन अशा पाच कोरोना बाधित रुग्णांचा दोन दिवसात मृत्यू झाल्यानंतर गुरूवारी पुन्हा देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) येथील साठ वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या रूग्णास दोन वर्षापासून ह्रदयविकाराचा त्रास होता. न्युमोनिया आजारामुळे तो बुधवारी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल गुरूवारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे.

दिवसभरात ३९ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून सर्वाधिक रूग्ण हे जालना शहरातील आहे. यात तलरेजानगरमधील तब्बल पंधरा, रूख्मीणीनगर, मोदीखाना येथील प्रत्येकी तीन, नाथबाबा गल्लीतील दोन, गुरू गोविंदसिंग नगर, भोलेश्‍वर नगर, इनकम टॅक्स कॉलनी, कुरेशी मोहल्ला, वसुंधरानगर, लक्ष्मीकांतनगर, दुखीनगर, पॉस्‍ट ऑफीस रोड परिसर, अग्रसेन नगर, बारवार गल्ली, जालना तालुक्यातील मजरेवाडी व दरेगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर बुलडाणा जिल्ह्यातील गारखेडा व देऊळगाव राजा येथील प्रत्येकी आणि घनसावंगी शहरातील दोन व्यक्तीचा समावेश आहे. दरम्यान झपाट्याने वाढलेल्या रूग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील एकुण बाधितांचा आकडा ६२० झाला असून त्यापैकी ३६८ बरे झाले आहे. तर आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रूग्णालयात २३३ रूग्णांवर उपचार सुरू आहे. 

कोविड हॉस्‍पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या एकुण बाधितांपैकी आठ रूग्ण गुरूवारी बरे झाले. त्यांच्या सलग दुसऱ्या स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली. बरे झालेल्यांमध्ये राज्य राखीव दलातील एक जवान, मोदीखाना , तेली समाज रामनगर गल्लीतील व कालीकुर्ती शनिनगर, मंगळबाजार, वैभव कॉलनी येथील मधील प्रत्येकी एक, जालना तालुक्यातील भाटेपुरी येथील एक व भोकरदन शहरातील कुरेशी मोहल्ल्यातील एकाचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.