हिंगोली : जमिनीतील पाणीपातळीत वाढ व्हावी, तसेच पाणीप्रश्न मिटण्यास मदत व्हावी, यासाठी जलयुक्त शिवार योजना हाती घेण्यात आली होती. तसेच २०१८-१९ मध्ये १४३ कामांना मंजुरी देण्यात आली. मात्र, यातील १३३ कामे कोरोना संकटामुळे रखडली आहेत.
युती शासनाने जलयुक्त शिवार योजना हाती घेतली होती. या अंतर्गंत ढाळीचे बांध, सिमेंट बंधारे, लूज बोल्डर, समतलचर, जाळीचे बंधारे आदी कामांचा समावेश करण्यात आला. याअंतर्गत कामेही करण्यात आली. त्यामुळे शेतीसाठी फायदा झाला.
हेही वाचा - अजबच... शाखा नसलेल्या बॅंकेला जोडले गाव -
दोन हजार ५९४ कामे मंजूर
या योजनेंतर्गंत जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात ११५ गावांची निवड जलयुक्त शिवार अभियान योजनेत करण्यात आली होती. निवड केलेल्या गावात दोन हजार ५९४ कामे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी २१३ कामे पूर्ण झाली. तर २३८ कामे प्रगतिपथावर असून १३३ कामे अद्यापही अपूर्ण आहेत.
हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली
कृषी विभाग, सिंचन विभाग यासह विविध यंत्रणेच्या माध्यमातून ढाळीचे बांध, सिमेंट बंधारे, लूज बोल्डर, समतलचर, जाळीचे बंधारे अशी विविध कामे करण्यात आली. जलयुक्त शिवारमधील केलेल्या कामामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली.
महाआघाडी सरकारने योजना बंद केली
तसेच विहीर, बोअरची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली. मात्र, महाविकास आघाडी सरकारने २०२० पासून ही योजना बंद केली आहे. मात्र, २०१८- १९ मधील ११५ गावांतील १४३ कामांना मार्चपर्यंतची मुदतवाढ दिली होती.
कामे पूर्ण करण्यासाठी हालचाली
परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र टाळेबंदी लागू केल्याने यातील १३३ कामे ठप्प झाली. आता प्रगतीपथावरील व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. याचा अहवाल शासनाला पाठवावा लागणार असल्याने कृषी विभागात जुळवाजुळव सुरू आहे.
पाणीपातळीत वाढ होण्यास मदत
जिल्ह्यातील पाणीपातळी कमालीची खालावली होती. त्यामुळे अनेक गावांत पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पावसाचे पाणी नदी, नाल्यातून वाहून जात होते. हे पाणी जमिनीत मुरल्यास पाणीपातळीत वाढ होवून पाणीटंचाई पासून मुक्तता मिळेल यासाठी ही जलयुक्त शिवार योजना हाती घेण्यात आली होती. अनेक गावात जलयुक्तची कामे झाल्याने पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली.
बहुतांश कामे प्रगतिपथावर
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडीच महिन्यापासून लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे मार्च, एप्रिलमध्ये ही कामे बंद होती. मात्र, शासनाच्या आदेशानुसार कामे करण्यास परवानगी मिळाल्याने यातील बहुतांश कामे प्रगतिपथावर आहेत.
-विजय लोखंडे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.