जालना जिल्हा रुग्णालयात ७४ कोरोना संशयित 

संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र.
Updated on

जालना - कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीबरोबर संशयित म्हणून  ७४ व्यक्ती जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सद्यःस्थितीत भरती असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. 

जिल्हाभरात एकूण एक हजार १०५ व्यक्ती संशयित असून, सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ७४ व्यक्ती भरती आहेत. आतापर्यंत आरोग्य विभागाने एक हजार ४३ व्यक्तींची तपासणी केली असून, त्यापैकी ८९४ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर चार व्यक्तीचे नमुने रिजेक्ट करण्यात आले आहेत.

आरोग्य विभागाने प्रयोगशाळेत पाठविलेल्या १३७ नमुन्यांचा अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून निगेटिव्ह आलेल्या २२१ जणांचे नमुने पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण २६० व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असून, यामध्ये संत रामदास मुलांच्या शासकीय वसतिगृहात ४८, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात ४१, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात २३, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात १९, पोलिस प्रशिक्षण केंद्रात ११२, परतूर येथे आठ, जाफराबाद येथे सहा तर भोकरदन येथे तीन व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 

परतूरच्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील तिघे निगेटिव्ह 

मुंबईवरून रुग्णवाहिकेद्वारे परतूर तालुक्यात आलेला २४ वर्षीय युवक कोरोनाबाधित आढळून आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या तीन जणांच्या स्‍वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती रविवारी (ता. तीन) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. 
मुंबईवरून ता. २९ एप्रिल रोजी पाच व्यक्ती रुग्णवाहिकेने परतूर शहरात दाखल झाले होते. त्यापैकी २४ वर्षीय युवकाचा अहवाल शुक्रवारी (ता. एक) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या संपर्कातील व्यक्तींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या युवकाच्या निकटच्या संपर्कात आलेल्या तीन जणांच्या नमुन्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून ते अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. 

जिल्ह्यातील सद्यःस्थिती 

  • जिल्हाभरात एकूण एक हजार १०५ संशयित व्यक्ती 
  • आतापर्यंत एक हजार ४३ व्यक्तींची तपासणी 
  • जिल्ह्यातील ८९४ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह 
  • पाठविलेल्या १३७ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()