कोरोना : काहीच धोका होणार नाही, फक्त स्वतःला जपा

Nanded News
Nanded News
Updated on

नांदेड : सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने जनजीवन विस्कळित झाले आहे. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. कोरोना या विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासन जीव ओतून कामाला लागले आहे. शासन जनतेला सुरक्षित राहण्यासाठी घरीच राहण्याचे आवाहन करीत आहे. मात्र, जनता या आवाहनाला न जुमानता विनाकारण रस्त्याने फिरत असल्याचे भयावह चित्र दिसत असून, निर्विचारी लोकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखून घरीच बसून स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक डॉ. सदानंद घाटबांडे यांनी केले आहे.
 
सद्यस्थितीत भारतातील राज्यांपैकी महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत. हा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. यावर प्रतिबंध घालून हा आकडा कमी करण्यासाठी शासनस्तरावर  सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी तसेच पोलिस व जिल्हा प्रशासन आपल्या जिवाची पर्वा न करता कसोशिने प्रयत्न करत आहेत. मात्र, काहीजण विनाकारण शोकाने फेरफटका मारत असून, स्वतःसोबतच दुसऱ्यांच्या जीवाला घोर लावत आहेत. यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांकडून त्यांना समज देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, काही टवाळखोर या कर्तव्यावरील पोलिसांसोबत हुज्जत घालून त्यांना टार्गेट करत आहेत.  

हेही वाचा - लॉकडाऊन : नंदुरबारहुन आलेल्या ‘त्या’ महिलेला मिळाले जिवदान
 
मित्रांनो, कोरोनाला समजून घ्या  
कोरोना (कोविड-१९) हा विषाणू अतिशय भयानक असला तरी, तो कुणाकडे चालून येत नाही. या विषाणूच्या संपर्कात जोपर्यंत व्यक्ती येत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला या विषाणूची लागण होणार नाही. त्यामुळे शासन लोकांना वारंवार घराच्या बाहेर न निघण्याची विनंती करीत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. तसेच आपण तर विनाकारण घराबाहेर तर निघूच नये, आपल्या आजूबाजूच्यांनाही घराबाहेर जाण्याचे टाळण्यास सांगावे. 

शासनाचे प्रयत्न तुमच्याचसाठी
कोरोनाला हरविण्यासाठी शासन आज त्यांच्यापरीने प्रयत्न करीत आहे. त्याच्यासह अनेक सामाजिक संस्था, मंडळ, अन्नदाते, दानशूर समोर आले आहेत. त्यांच्याद्वारे गरजू, गरिबांना अन्नदान, जीवनावश्‍यक वस्तूंचा मोफत पुरवठा केला जात आहे. लॉकडाउनमुळे बाहेर राज्यांतील अडकून पडलेल्या रोजगारांना जेवणाची व निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी करण्यामागील उद्देश म्हणजे कोणीही गरीब, मजूरदार, गरजू अन्नावाचून उपाशी राहू नये, हा आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचे गांभीर्य ओळखून जनतेनेही शासनाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करायला हवे.

कोरोनाला हरविण्यासाठी फक्त ऐवढेच करा

  • विनाकारण घराबाहेर पडू नका व कुणाला बाहेर जाऊही देऊ नका.
  • दर दोन तासांनी आपले हात साबणाने स्वच्छ धुवा. सॅनिटायझरचा वापर करा.
  • अत्यावश्‍यक असल्यास डोळ्यांवर गॉगल व तोंडाला मास्क लावूनच घराबाहेर पडा.
  • सर्दी, ताप, खोकला जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
  • आपल्या परिसरात कोणी असा रुग्ण आढळल्यास लगेच आरोग्य विभागाला कळवा.
  • शासकीय कर्मचारी तुमच्याच हितासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे त्यांना विनाकारण त्रास अथवा विरोध करू नका.
  • कोरोना आपणाला बाहेर बोलावतो, त्यामुळे आपण कृपा करून बाहेर जाऊ नका.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.