परभणी ः कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृतीसाठी आता सर्वसामान्य नागरिकांनीदेखील पुढाकार घेण्यास सुरवात केली. ‘कोरोना’ विरुद्धच्या या लढाईत परभणीतील चित्रकारांनीदेखील उडी घेतली आहे. या चित्रकारांनी रस्त्यावर स्वखर्चातून पेटिंग करून जनजागृती सुरू केली आहे. या संदर्भात प्रशानानेदेखील त्यांना पाठिंबा दिला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांमध्येदेखील कोरोना विषाणूसंदर्भातील भय कमी करून जागरूक राहण्याचे आवाहन केले जात आहे. आता या कामात सर्वसामान्य नागरिकही उतरले आहेत. परभणीतील चित्रकार किरण गायकवाड, प्रमोद अंभोरे, संजय खिल्लारे व हर्षराज खिल्लारे यांनी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर स्वखर्चातून पेटिंग करून कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती सुरू केली आहे.
हेही वाचा - हिंगोलीत आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
हे संदेश दिले चित्रातून
या संदेशामध्ये या चित्रकारांनी ‘कोरोना हरेल, माझा देश जिंकेल’ असा संदेश देऊन लोकांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘कोरोनाला घाबरू नका, मात्र जागरूक राहा’ असे या संदेशातून सांगण्याचा प्रयत्न या चित्रकारांनी केला आहे.
प्रशासनाने परवानग्या मिळून दिल्या
यासाठी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी कैलास सोमवंशी यांनी या चित्रकारांना पाठिंबा देत या जनजागृतीसाठी प्रशासकीय स्तरावरील परवानग्या मिळून दिल्या आहेत. या सर्व पेंटिंग राष्ट्रीय महामार्गावर केल्या जाणार असल्याने नांदेड येथील कार्यालयातून परवानगी मिळणे आवश्यक होते. ती परवानगीदेखील त्यांनी मिळवून दिली आहे. परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनीदेखील या पेंटिंग साकारण्यास परवानगी दिल्याची माहिती कैलास सोमवंशी यांनी दिली.
हेही वाचा - कळमनुरीत ५० खाटांच्या कोरोना वार्डाची स्थापना
जिल्ह्यात अनेकांना मदतीचा ओघ सुरु
परभणी शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक संस्थांतर्फे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदत केली जात आहे. यानिमित्त मदतीचा ओघ सुरु आहे. गरजवंतांच्या मदतीला अनेक हात धावत असून मानवतेवर आलेल्या या संकटाचा मुकाबला करण्यासाठी अनेक दानशूर सरसावल्याचे दिसून येत आहे. जात, पात, धर्म उचनिचतेच्या तकलादू भिंती त्यामुळे कोसळल्याचे व मानवतेचा झरा ओसंडून वाहत असल्याचे सकारात्मक चित्र पाहावयास मिळत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.