Corona Update: मराठवाड्यात २४३ नवे रुग्ण, बीडमध्ये सर्वाधिक बाधित

सर्वाधिक रुग्ण बीड जिल्ह्यात आढळले. या जिल्ह्यात १४३ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला
corona update
corona updatecorona update
Updated on
Summary

सर्वाधिक रुग्ण बीड जिल्ह्यात आढळले. या जिल्ह्यात १४३ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला

औरंगाबाद: मराठवाड्यात २४३ नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली तर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजही सर्वाधिक रुग्ण बीड जिल्ह्यात आढळले. या जिल्ह्यात १४३ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एका रुग्णाचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात २० रुग्णांची भर पडली. यात सातजण शहरातील आहेत. दिवसभरात मृत्यूची नोंद झाली नाही. नांदेड जिल्ह्यात सात जणांचा अहवाल बाधित आला. दिवसभरात नऊ जणांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. सध्या ४९ रुग्ण उपचार घेत आहेत. परभणी जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला. सध्या १४ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५१ हजार २०४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४९ हजार ९०३ जणांनी त्यावर मात केली आहे.

एक हजार २८७ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. नव्याने एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आजघडीला एकूण दहा रुग्णांवर उपचार चालू आहेत. जालना जिल्ह्यातील विविध भागात सहा रुग्णांची भर पडली तर तीन रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १ हजार १८४ जणांचा बळी गेलेला आहे. एकूण ६१ हजार ६८६ बाधितांपैकी आतापर्यंत ६० हजार ४२१ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ८१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

corona update
Rain Update: औरंगाबादेत तिसऱ्या दिवशीही सूर्यदर्शन नाही; दिवसभर पावसाची रिपरिप

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दोन हजार ४२० झाली आहे. जिल्ह्यात ९३८ जणाच्या आरटीपीसीआर टेस्ट झाल्या यात पाचजण पॉझिटिव्ह आले. एक हजार ३८३ जणाच्या अँटीजेन टेस्ट झाल्या यात दहा जण पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९१ हजार ७८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ८९ हजार २१२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दोन हजार ४२० जणाचा मृत्यू झाला असून १४९ जणांवर उपचार सुरू आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात ५१ रुग्णांची भर पडली. मृत्यूची नोंद झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.