Marathwada Corona Update: २४ तासांत १८५ नवीन रुग्ण, बीड आघाडीवर

मराठवाड्यात सात कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
corona updates
corona updatescorona updates
Updated on

औरंगाबाद: मराठवाड्यात मंगळवारी (ता.१७) दिवसभरात १८५ नवे कोरोनाबाधित आढळले. सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात सर्वाधिक १०७ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ४३ रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात १५ रुग्णांची भर पडली. यात शहरातील सहा रुग्ण तर ग्रामीणमधील नऊ रुग्ण आहेत. दिवसभरात २५ जणांना (शहर ०८, ग्रामीण १७) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लाख ४४ हजार ८५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बाधित रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ७८३ झाली आहे. तीन हजार ५२३ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी आढळलेल्या बाधितांमध्ये औरंगाबाद विमानतळ एक, देवानगरी परिसर एक, बीड बायपास परिसर एक आणि अन्य ठिकाणचे तीन रुग्ण आहेत. ग्रामीणमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये फुलंब्री एक, गंगापूर तीन आणि पैठण येथील पाच जणांचा समावेश आहे.

जालना जिल्ह्यातील विविध भागांत सहा रुग्णांची भर पडली. २१ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एक हजार १८४ जणांचा बळी गेलेला आहे. एकूण ६१ हजार ६६२ बाधितांपैकी आतापर्यंत ६० हजार ४१७ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ६१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लातूर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण मृत्यूची संख्या दोन हजार ४१८ झाली आहे. जिल्ह्यात २८४ जणाच्या आरटीपीसीआर टेस्ट झाल्या. यात चार जण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच ८९० जणाच्या अँटीजेन टेस्ट झाल्या यात पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९१ हजार ७४७ जणांना कोरोनाची लागण झाली. यात ८९ हजार १७० जणांनी कोरोनावर मात केली. सध्या १५९ जणावर उपचार सुरु असून दोन हजार ४१८ जणाचा मृत्यू झाला आहे.

corona updates
Hingoli Rain : हिंगोलीत दुसऱ्या दिवशी पाऊस, पिकांना जीवदान

बीड जिल्ह्यात १०७ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर एकाचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात ४३ नवे रुग्ण आढळले तर तिघांचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यात मृत्यूची नोंद झाली नाही. दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नांदेड जिल्ह्यात तीन नवे बाधित आढळले. कुणाचा मृत्यू झाला नाही. हिंगोली जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह अहवाल आला नाही. शिवाय मृत्यूचीही नोंद झाली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()