बीडमध्ये रुग्णसंख्या शंभरच्या आत आली असून, ९२ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला
औरंगाबाद: मराठवाड्यात सोमवारी (ता. १६) १८७ कोरोनाग्रस्तांची भर पडली तर औरंगाबाद जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला. इतर सात जिल्ह्यांत मृत्यूची नोंद झाली नाही. बीडमध्ये रुग्णसंख्या शंभरच्या आत आली असून, ९२ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उस्मानाबाद जिल्ह्यात ७० नवे बाधित आढळले. परभणी आणि जालना जिल्ह्याला दिलासा मिळाला असून, या दोन्ही जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही.
औरंगाबाद शहरात केवळ दोन रुग्ण
जिल्ह्यात सात कोरोना रुग्ण आढळले. यामध्ये शहरातील दोन रुग्ण आहेत. उर्वरित पाच रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. दरम्यान, एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिवसभरात २८ जणांना सुटी देण्यात आली. यात शहरातील नऊ तर ग्रामीणमधील १९ रुग्ण आहेत. जिल्ह्यात शनिवारपर्यंत एक लाख ४४ हजार ६० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत एकूण तीन हजार ५२३ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नांदेडला सहा जण बरे
नांदेड जिल्ह्यात चौघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. सध्या ५२ रुग्ण उपचार घेत असून, त्यातील तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. दिवसभरात सहा कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली.
परभणीत दोन रुग्ण बरे
परभणी जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. दिवसभरात दोन रुग्णांना सुटी देण्यात आली. सध्या १४ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५१ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४९ हजार ८९९ जणांनी त्यावर मात केली आहे. एक हजार २८७ जणांचा मृत्यू झाला आहे.
हिंगोलीत एक रुग्ण बरा
हिंगोली जिल्ह्यात एक बाधित आढळून आला. दिवसभरात एक रुग्ण बरा झाल्याने त्याला सुटी देण्यात आली. आजघडीला एकूण १४ रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्यापैकी चार रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १६ हजार २० रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १५ हजार ६१६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ३९० जणांचा मृत्यू झाला आहे.
जालन्याला दिलासा
जालना जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळला नाही. विविध भागात उपचारानंतर १७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ६१ हजार ६५६ बाधितांपैकी आतापर्यंत ६० हजार ३७९ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १ हजार १८३ जणांचा बळी गेलेला आहे. सध्या ९४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बीड, उस्मानाबाद, लातूरमध्ये मृत्यू नाही
उस्मानाबाद जिल्ह्यात ७०, बीड जिल्ह्यात ९२ आणि लातूर जिल्ह्यात १३ नवे रुग्ण आढळले. या तीनही जिल्ह्यात कोरोनामुळे दिवसभरात कुणाचा मृत्यू झा नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.