दिलासादायक! मराठवाड्यात रुग्णसंख्या पाच हजारांच्या आत; मृत्यूदरही घटला

मराठवाड्यामध्ये ४ हजार ८८९ नवे रुग्ण, उपचारादरम्यान १०४ जणांचा मृत्यू
covid 19
covid 19covid 19
Updated on

औरंगाबाद: मराठवाड्यात कोरोना रुग्णसंख्येत (covid 19 cases) आणखी घट झाल्याचे सोमवारी (ता. १०) पाहायला मिळेल. लातुरमध्ये तर सव्वा महिन्यानंतर रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. नांदेडलाही असेच चित्र आहे. हिंगोलीतही पन्नासच्या आत नवे रुग्ण आहेत. मराठवाड्यात दिवसभरात ४ हजार ८८९ बाधितांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्येमध्ये बीड १२९५, उस्मानाबाद ८३३, जालना ६९७, लातूर ६९६, औरंगाबाद ६५५, परभणी ३७४, नांदेड २९४, हिंगोली ४५ रुग्ण वाढले. मराठवाड्यात काल ५ हजार १८७ रुग्णांची नोंद होती.

मृतांचा आकडाही आज कमी झाल्याचे दिसले. १०४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात औरंगाबादेत २४, लातूर १८, बीड १५, उस्मानाबाद १४, नांदेड १२, जालना- परभणीत प्रत्येकी ८, हिंगोलीतील पाच जणांचा समावेश आहे. मराठवाड्यात काल १४० जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

covid 19
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईला सर्वाधिक लसीकरण, अतुल सावेंची राज्य सरकारवर टीका

औरंगाबाद जिल्ह्यात २४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २ हजार ७७९ जणांचा मृत्यू झाला. वाळूज येथील पुरुष (वय ३६), सिल्लोड येथील पुरुष (३५), गंगापूर येथील पुरुष (६१), फुलंब्री येथील महिला (५५), गंगापूर येथील महिला (९०), कन्नड येथील पुरुष (५५), हर्सूल येथील पुरुष (४६), वैजापूर येथील पुरुष (६४), पैठण येथील पुरुष (७०), सिल्लोड येथील पुरुष (६५), गंगापूर येथील पुरुष (४३), वैजापूर येथील महिलेचा (६५) घाटी रग्णालयात मृत्यू झाला. शंकरपूर (ता.गंगापूर) येथील महिला (६५), पळशीतील पुरुष(६१), गंगापूर येथील पुरुष (३७), वैजापूर येथील पुरुष (५३), रांजणगावातील महिला (४५),कन्नडमधील पुरुष (३६), सिडको एन-चार भागातील पुरुष (९०),भावसिंगपूरा भागातील पुरुष (३९), मयूर पार्कमधील पुरुष (८५), उल्कानगरीतील व्यक्ति (८५), उल्कानगरीतील पुरुष (६०), सातार परिसरातील पुरुष (६७), भीमनागरातील पुरुषाचा (५२) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

covid 19
केले रजिस्ट्रेशन अन् चक्क मिळाले कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्र

औरंगाबादेत ६५५ बाधित, बाराशे बरे
औरंगाबाद जिल्ह्यात ६५५ कोरोनाबाधित आढळले. त्यात शहरातील २१४, ग्रामीण भागातील ४४१ जणांचा समावेश आहे. रुग्णसंख्या १ लाख ३३ हजार २४ झाली असून आणखी १ हजार २४७ रुग्ण बरे झाले. त्यात शहरातील ६०७, ग्रामीण भागातील ६४० जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १ लाख २२ हजार ७११ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ७ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()