Corona Updates: चांगली बातमी! मराठवाड्यात दुसऱ्या लाटेला ओहोटी

दिवसभरात ९३७ नवे रुग्ण, तिसरी टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक
covid 19
covid 19covid 19
Updated on

औरंगाबाद: मराठवाड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला (second wave of covid 19) ओहोटी लागली आहे. दिवसभरात ९३७ नवे रुग्ण आढळले तर ४२ मृत्यूची नोंद झाली. दरम्यान, रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरी कोरोना (corona updates in marathwada) अजून कायम असल्याने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी २११ नव्या रुग्णांची भर पडली. यात शहरातील ६३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत १,३७,८३८ कोरोनामुक्त झाले. सध्या २,५६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतपर्यंत एकूण ३,२५९ जणांचा मृत्यू झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात १२६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही. १४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या ७४२ रुग्ण उपचार घेत असून, १७ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९० हजार २६२ झाली असून, आतापर्यंत यातील ८७ हजार १२० रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृतांची रुग्णांची संख्या एक हजार ८९० झाली आहे.

covid 19
PET Exam: पेटचा दुसऱ्या टप्प्याची नोंदणी सोमवारपासून

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा उपचार सुरू असताना १६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाचे नवे ९० रुग्ण समोर आले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी ८०५ जणांच्या आरटीपीसीआर टेस्ट झाल्या यात ३४ तर एक हजार ८८३ जणांच्या अँटीजेन टेस्ट झाल्या यात ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ८९ हजार ४२७ जण बाधित झाले. यापैकी ८५ हजार ८८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दोन हजार २५३ जणांचा मृत्यू झाला. तर एक हजार २८७ जणांवर उपचार सुरू आहेत.

परभणी जिल्ह्यात शनिवारी ४६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. चार रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार १५१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी ४७ हजार ५९६ जण कोरोना मुक्त झाले आहेत. आजपर्यंत एक हजार २४७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार ३०८ जण उपचार घेत आहेत. हिंगोली जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला तर नवीन २५ रुग्ण आढळून आले. दिवसभरात ३६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. बीड जिल्ह्यात २४३ नवे आढळले तर सहाजणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात १७७ रुग्णांची भर पडली तर दोन मृत्यूची नोंद झाली. जालना जिल्ह्यात २८ नवे रुग्ण आढळले तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.