‘कोरोना’चा कशावर झाला परिणाम, ते वाचाच  

File photo
File photo
Updated on

नांदेड : काही दिवसांपासून चीनमधील कोरोना विषाणू बॉयलर कोंबडीच्या मांसामधून होत असल्याच्या पोस्टफ फोटोसह सोशल मीडियाच्या माध्यमातून वाऱ्यागत फिरत आहेत. या गोष्टीला शास्त्रीय दृष्ट्या कोणताही थारा नसला तरीही अनेक नागरिकांनी कोरोना विषाणूचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे. 

शेतीला जोडधंदा असलेला पोल्ट्री व्यवसाय ‘कोरोना’ व्हायरसमुळे चांगलाच संकटात सापडला आहे. मागील एक महिन्यापासून कोरोना व्हायरस बद्दलच्या पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. या मेसेजचा धसका मांसाहार करणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे. परिणामी, शहरांसह ग्रामीण भागातील चिकनच्या विक्रीमध्ये ७० टक्क्यांनी घट झाल्याचे मटन विक्रेत्यांनी सांगितले आहे. कुक्कुटपालन व्यावसायिकांना दररोज हजारो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतीला जोडधंदा असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे.

भविष्यात हे चित्र बदललेले नाही तर कुक्कुटपालन व्यावसायीकांना आर्थिक नुकसानासारख्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. कोरोनाचा विषाणू पक्षाच्या कच्च्या मांसापासून प्रसारीत होत असल्याचा वैज्ञानिकांचा दावा आहे. मात्र, देशभरात पूर्णपणे शिजवलेले मटन खाल्ले जात असल्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचा जिवाणू किंवा विषाणू असण्याची शक्यता जवळपास नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लोक खोट्या अफवेवर विश्‍वास ठेवून कोरोना व्हायरसच्या संकटाने भयभीत झाले आहेत. पशुसंवर्धन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी पोल्ट्री फार्म व्यावसायिक सदानंद साळवे, मयुरेश तायडे यांनी केली आहे.  
 
जनजागृतीची गरज
ग्रामीण भागातील सुशिक्षित, बेरोजगार तरुण आज शेतीपुरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसायाकडे वळले आहेत. लाखो रुपयांचे बॅंकांचे कर्ज घेऊन हे व्यवसाय त्यांनी उभारले आहेत. पण हा व्यवसाय अडचणीत पुन्हा कोरोनाच्या भीतीने संकटात सापडला आहे. याची राज्य शासनाने तातडीने दखल घ्यावी व शासनाच्या पशुवैद्यकीय कुक्कुटपालन विभागामार्फत जनजागृती करून पोल्ट्री व्यावसायीकांना दिलासा देवून प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांकडून होत आहे.

हेही वाचलेच पाहिजे - महिला सुरक्षेसाठी `ह्या’ आहेत पोलिसांच्या उपाययोजना
 
‘बर्ड फ्लू’ नंतर कोरोनाचे संकट
सोशल मिडियावर कोरोना विषाणूच्या चुकीच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यावसायिक संकटात सापडला आहे. काही वर्षांपूर्वी बर्ड फ्लू या आजारामुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला होता. त्याची पुनरावृत्ती पुन्हा ‘कोरोना’च्या व्हायरसमुळे होत आहे. ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने वेळीच दखल घ्यावी व व्यावसायीकांना होणाऱ्या हानीतून सावरण्यासाठी आर्थिक मदत करावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.