बंदमुळे काकडी चारली बैलांना 

ढोबळेवाडी (ता. घनसावंगी) बंदमुळे विक्री न होऊ शकलेली काकडी बैलांना टाकताना.
ढोबळेवाडी (ता. घनसावंगी) बंदमुळे विक्री न होऊ शकलेली काकडी बैलांना टाकताना.
Updated on

घनसावंगी  (जि.जालना) -  बाजार बंद आणि प्रत्येक गावातील रस्ते निर्मनुष्य यामुळे विक्री न होऊ शकलेली काकडी ढोबळेवाडी येथील शेतकरी उद्धव यादव यांनी बैलांना चारली. 

घनसावंगी तालुक्‍यातील ढोबळेवाडी येथील शेतकरी उद्धव यादव यांनी एक एकर क्षेत्रात काकडीचे पीक घेतले. आतापर्यंत २० हजार रुपये खर्च केले. या काकडीच्या उत्पादनातून त्यांना ४० ते ५० हजार रुपयांचे उत्पन्न होण्याची शक्‍यता होती; परंतु ऐन काकडी तोडणी करून बाजारात विकण्याच्या वेळी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र बाजार बंद आणि प्रत्येक गावातील रस्ते ओस पडत आहे. त्याचबरोबर विक्रीसाठी बाजारात जावे तर तालुक्‍याबरोबर जिल्हा तसेच राज्यातील सर्वच बाजारपेठा जवळपास बंद आहे. वाहतुकीची साधने नसल्याने काढणी केलेली काकडी विक्री करणे शक्‍य झाले नाही. 

गावात भाव मिळणे शक्‍य नाही, बाहेर विक्री करण्यासाठी फिरल्यास संसर्ग होण्याची भीती यामुळे शेतकरी उद्धव यादव यांनी रविवारी (ता.२२) काकडी चक्क बैलांना चारली. यामुळे त्यांना अंदाजे ४० ते ५० हजारांचे नुकसान सहन करावे लागले. 

मागील वर्षी खरीप हंगामावर परतीच्या पावसाचे संकट होते. रब्बीतील अनेक अडचणी पाहता काकडीतून कमाई करण्याचा प्रयत्न होता. परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बाजारपेठा बंद असल्याने काकडी विक्री करणे शक्‍य नाही,  त्यामुळे काकडी विक्रीतून होणारी कमाई आता मिळण्याची चिन्हे नाहीत.  त्यामुळे काकडी जनावरांना चारण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
- उद्धव यादव, 
शेतकरी ढोबळेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.