वसमत तालुक्यात कापसाचे क्षेत्र घटले, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ

वसमत तालुक्यात कापसाचे क्षेत्र घटले, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ
Updated on

वसमत (जि.हिंगोली) : गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, मजूरांचा अभाव व एकुणच या द्राविडी प्राणायामात उत्पन्नापेक्षा वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कापूस लागवडीकडे Cotton Cultivation पाठ फिरवल्याचे लागवड आकडेवाडीवरुन स्पष्ट होते. मागील २०२०-२१ वर्षीच्या तुलनेत २०२१-२२ चालू वर्षाच्या हंगामात तब्बल सात हजार २०० हेक्टरवर कापसाचे क्षेत्र घटल्याचे दिसत आहे. या वर्षी वेळेवर मृग नक्षत्राचा पाऊस Rain चांगलाच बरसल्याने पहिल्याच पावसात वसमत Vasmat तालुक्यात शेतकऱ्यांनी शंभर टक्के पिकांची लागवड पूर्ण केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, हळद, कापुस, मूग, उडीद, ज्वारी, मका, तूर आदी पिकांचा समावेश आहे. वसमत तालुक्यात Hingoli एकुण ९०हजार १६१ हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. त्यापैकी ७८ हजार ९३९ हेक्टर क्षेत्र लागवड लायक आहे. cotton cultivation decline in vasmat tahsil hingoli news

वसमत तालुक्यात कापसाचे क्षेत्र घटले, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ
Aurangabad: पिकांमध्ये निलगायींचे धुडगूस, शेतकऱ्यांमध्ये दहशत

यंदा एकुण लागवड क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे सोयाबीनची ३५ हजार ३०० हेक्टरवर लागवड झाली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत १२०० हेक्टर वाढ झाली आहे. तर ११ हजार ५०० हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आली आहे.मागच्या वर्षाच्या तुलनेत २५०० हेक्टर हळदीच्या लागवडीत वाढ झाली आहे. मात्र या वर्षी कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मागच्या वर्षी १९ हजार २०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती. या वर्षी ती घटून १२००० हेक्टरवर आली आहे. म्हणजेच कापसाच्या लागवडीत तब्बल ७२०० हेक्टर घट झाली आहे. कापूस लागवडीत घट येण्यामागे प्रामुख्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव, मंजूर व इतर उत्पादन खर्चात भरपूर वाढ झाल्याने उत्पन्नाची हमी राहिली नाही. तसेच रब्बीचे पिक घेता येत नाही. त्या उलट कापसाऐवजी सोयाबीनची लागवड केल्यास खरिपाबरोबरच रब्बीचे गहू व हरभरा पिक घेता येते. या बरोबरच तूर ७००० हेक्टर, मूग २६०० हेक्टर, उडीद १२०० हेक्टर, ऊस ८०९२ हेक्टर व मका ९० हेक्टर लागवड करण्यात आली आहे.

वसमत तालुक्यात कापसाचे क्षेत्र घटले, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ
भागवत कराडांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपदाचा स्वीकारला पदभार

आंतरमशागत करून पिके तणमुक्त ठेवावे. नत्रयुक्त खते मूग, उदीड, सोयाबीन पिकास टाळावे. सोयाबीन पिकावर चक्री भूंग्यांचे प्रादुर्भाव काही भागात दिसून येत आहे, तरी शेतकऱ्यांनी अर्ल्ट राहून वेळीच विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कीटकनाशकाचा वापर करावा.

- गोविंद कल्याणपाड, तालुका कृषी अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()