Latest Maharasthra News: जिवाची पर्वा न करता तिने तीनही मुलांना लाडाकोडात वाढविले, लहानाचे मोठे केले. उतारवयात मुले आपली काळजी घेतील, अशी तिची माफक अपेक्षा. पण, मुलांनी जे करायचे ते केलेच. वयोवृद्ध, आजारी असलेल्या मातेला त्रास देणे सुरू केले.
एकदा तर तिला घराबाहेर हाकलण्यापर्यंत त्यांची मजल गेली. शेवटी सहन करणार तरी किती? म्हणून मातेने मुलीच्या मदतीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने तीन मुले आणि सुनेला चांगलीच चपराक दिली.