लॉकडाउनमुळे कलावंतांच्या आयुष्याचाच झालाय ‘तमाशा’

पुन्हा कोरोनाची दुसरी लाट पसरू लागल्याने शासनाने देवस्थान तसेच गावोगावच्या यात्रा रद्द केल्या
artist
artistartist
Updated on

देवधानोरा (उस्मानाबाद): कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाउन जाहीर केले. पण, याचा तमाशा कलावंतांना फटका बसला आहे. चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा असतात. मात्र, याच महिन्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट पसरू लागल्याने शासनाने देवस्थान तसेच गावोगावच्या यात्रा रद्द केल्या. सलग दुसऱ्यावर्षीही यात्रा रद्द झाल्याने या कलावंतांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, ते आर्थिक संकटात सापडले आहेत.

यात्रा रद्द झाल्याने तमाशाचे फड एकाच जागेवर उभे आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे तमाशा कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. मोठ्या तमाशा मंडळावर कर्ज काढून आपल्या ताफ्यातील कलावंतांना जेऊ घालण्याची वेळ आली आहे. यामुळे तमाशा कलावंत हतबल झाला असून, शासनाने तमाशा कलावंतांना तातडीची मदत करावी, अशी मागणी तमाशा कलावंताकडून केली जात आहे. ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजूर तसेच कला अंगी असणाऱ्या लोकांना तमाशाच्या माध्यमातून लोककला जपली आहे.

artist
दिलासादायक! बाधितांची संख्या घटल्याने औरंगाबादेतील दहा कोवीड केअर सेंटर बंद

हा वर्ग तमाशाच्या माध्यमातून रोजगार मिळवतो. मार्च ते मे असे तीन महिने तमाशा मंडळात काम करून स्वतःची आर्थिक परिस्थिती सावरणारे अनेक लोक तमाशात काम करतात. मात्र, यंदा पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे गावोगावच्या यात्रा रद्द झाल्या. यामुळे तमाशा कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. चार-पाच वर्षांपासून आर्थिक टंचाईचा सामना करणाऱ्या तमाशा कलावंतांना नोटाबंदी, निवडणूक आचारसंहिता व आता कोरोनाच्या संकटाने आर्थिक फटका दिला आहे.

artist
चांगली बातमी! मराठवाड्यातील कोरोना रुग्णसंख्येत होतेय घट

होळीपासून महाराष्ट्रातल्या प्रमुख देवस्थानाच्या गावोगावच्या यात्रांना सुरुवात होते. यात्रांचा खरा हंगाम पाडव्यापासून सुरू होतो. मात्र, याच्या सुपाऱ्या या अगोदरच घेतल्या जातात. यंदा घेतलेल्या सुपाऱ्या कोरोनामुळे गावकऱ्यांनी रद्द केल्या. यामुळे तमाशा कलावंतवरच उपासमारीची वेळ आली आहे. मोठ्या तमाशा मालकांचे लाखोंचे नुकसान झाले असून, आपल्या फडातील कलावंतांना कर्ज घेऊन जेवण घालण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कोरोना संकट नेमके कधी संपेल, हे अनिश्चित आहे. सरकारने तमाशा कलावंतांना तातडीची मदत करण्याची मागणी तमाशा कलावंत व फड मालकांकडून करण्यात येत आहे.

artist
औरंगाबाद विद्यापीठाचा गर्जे महाराष्ट्रसोबत करार

हाताला मिळेल ते काम करायची तयारी हाय. पण सगळं बंद असल्याने कुटुंब, तमाशातली काम करणारी माणसं जगवायची भ्रांत हाय, काही दिवस मोलमजुरी करून माणसं जगविली. आता सगळंच बंद झाल्याने जगणं मुश्कील झालंय. त्यामुळे सरकारने काही तरी मदत करावी.
- सुग्रीव थोरात, तमाशा कलावंत देवधानोरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.