जालना: जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या होत असलेल्या चाचण्यांची संख्या कमी आहे. तसेच लसीकरणाची गतीही कमी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांबरोबरच लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, अशी सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी (ता.२८) दिली. जिल्ह्यातील बाल रुग्णालयांना आरटीपीसीआर चाचण्यांच्या किटस मोफत देण्यासह मंठा येथे लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प बसविण्याचे निर्देश श्री. टोपे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीला पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, रवींद्र परळीकर, जिल्हा शल्यचित्किसक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, डॉ. प्रताप घोडके, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, अन्न व औषध विभागाच्या अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.टोपे म्हणाले, की जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसह चाचण्यांचे उद्दिष्टही देण्यात आले आहे. प्रत्येक बाल रुग्णालयांना आरटीपीसीआर चाचण्यांचे किट मोफत उपलब्ध करुन देऊन ज्या बालकांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा प्रकारची कोरोनाची लक्षणे असतील अशा प्रत्येकाचे तपासणी करण्याच्या सूचनाही श्री टोपे यांनी यावेळी दिल्या. ग्रामीण भागात लसीकरणाबाबत जनजगृती करावी, जिल्ह्यात २०० लसीकरण केंद्र सुरु करण्यासह दररोज लसीकरण केले जाईल, यादृष्टीने नियोजन करावे.
निर्बधांची कडक अंमलबजावणी
राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. सायंकाळी पाच वाजेनंतर मुक्त संचारास बंदी करण्यात आली आहे. लग्नसमारंभ तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही. विनामास्क कोणीही फिरणार नाही, याचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही श्री टोपे यांनी यावेळी केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.