उपचारादरम्यान आणखी २९ जणांचा मृत्यू झाला. त्यात औरंगाबादेत ११, जालना सहा, लातूर-उस्मानाबादेत प्रत्येकी चार, बीड तीन, परभणीतील एकाचा समावेश आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात Corona कोरोना Marathwada Corona Updates रुग्णांच्या संख्येत रविवारी (ता.१३) आणखी घट झाली. दिवसभरात ३९७ बाधित आढळले. जिल्हानिहाय आढळलेले नवे रुग्ण असे; औरंगाबाद Aurangabad ११३, बीड Beed १०८, उस्मानाबाद Osmanabad ६३, लातूर Latur ४४, परभणी Parbhani २५, जालना Jalna २२, नांदेड Nanded २०, हिंगोली दोन. मराठवाड्यात काल (ता.१२) ५३१ रुग्ण आढळले होते. उपचारादरम्यान आणखी २९ जणांचा मृत्यू झाला. त्यात औरंगाबादेत ११, जालना सहा, लातूर-उस्मानाबादेत प्रत्येकी चार, बीड तीन, परभणीतील एकाचा समावेश आहे. काल २३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. Covid 397 Cases Reported In Marathwada Region
औरंगाबादेत ११३ बाधित
औरंगाबाद जिल्ह्यात ११३ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यात शहरातील १४, ग्रामीण भागातील ९९ जण आहेत. रुग्णांची संख्या एक लाख ४४ हजार ६९४ वर पोचली. बरे झालेल्या आणखी २२९ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात शहरातील १५ तर ग्रामीण भागातील २१४ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत एक लाख ३९ हजार ६२३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एक हजार ७३९ जणांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबादेत आणखी अकरा जणांचा मृत्यू झाला. चंदापूर (ता. सिल्लोड) येथील महिला (वय ४०), करमाड (जि. औरंगाबाद) येथील महिला (७०), सिडको येथील महिला (५१), बिडकीन (ता. पैठण) येथील पुरुष (६०), धानोरा (ता. सिल्लोड) येथील महिला (३६), सिंदोळ (ता. सोयगाव) येथील पुरुष (३५), दौलताबाद (ता. औरंगाबाद) येथील पुरुष (५७), चिकलठाणा येथील पुरुषाचा (७५) घाटी रुग्णालयात तर कसाबखेडा, (ता. खुलताबाद) येथील पुरुष (६५), हडकोतील पुरुष (६७), बन्सीलालनगरातील महिलेचा (६९) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत तीन हजार ३४२ जणांचा मृत्यू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.