Crime: सेल्फी काढण्याच्या बहाण्याने विद्यार्थीनीला मारली मिठी, पराक्रमी शिक्षकावर गुन्हा दाखल

Teacher girl student Crime : तु शिक्षण बंद केले की चालु असे शिक्षक याने पिडित महिलेस विचारले असता शिक्षण बंद केल्याचे सांगण्यात आले.
Crime: सेल्फी काढण्याच्या बहाण्याने विद्यार्थीनीला मारली मिठी, पराक्रमी शिक्षकावर गुन्हा दाखल
Updated on

Beed Crime: तु कधी आली,माझ्याजवळ ये,तुझ्याबरोबर सेल्फी काढायचा असे म्हणत माहेरी आरामा करिता आलेल्या गर्भवती महिलेस एका गुरुजींने मिठी मारली.सदरील प्रकार गेवराई तालुक्यात रविवार(ता १४) एका गावखेड्यात घडला.शिक्षकाच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गर्भवती असल्याने २१ वर्षीय महिला ही गेवराई तालुक्यातील एका गावखेड्यात आली होती. पिडितेच्या घरी रविवारी (ता १४)दुपारी तीन वाजता एक शिक्षक घरी गेला.चहा पाणी करत शिक्षक याची बडदास्त देखील केली.तु शिक्षण बंद केले की चालु असे शिक्षक याने पिडित महिलेस विचारले असता शिक्षण बंद केल्याचे सांगण्यात आले.

माहेरी कशामुळे आली असे विचारल्यावर गर्भवती असल्याने आराम करण्यासाठी असे सांगीतले.त्यानंतर शिक्षकांने दार बंद करून तु माझ्याजवळ बस मला तुझ्याबरोबर फोटो काढायचे असे म्हणत जवळ घेतले.यानंतर महिला घाबरून ओरडली.ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील दोघे मदतीला धावून शिक्षक याच्या तावडीतून महिलेची सुटका केली.

यावरुन पिडितेच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिक्षक फरार झाला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस जमादार नारायण काकडे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.