Beed News : एखाद्या आरोपीवर एमपीडीए किंवा मोकासारखी प्रतिबंधात्मक कारवाई करायची असेल तर त्याच्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड शोधताना पोलिसांच्या नाकी नऊ यायचे. आता फिर्यादीसह सर्व नोंदी ऑनलाईन ठेवल्या जात आहेत.
एखाद्या गुन्हेगाराची कुंडली शोधायची तर एक क्लिक बस्स होते. एफआयआरसह इतर गुन्हेविषयक व पोलिसांच्या कामांच्या सर्व नोंदी ऑनलाईन ठेवण्यासह त्याचा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी व प्रतिबंधात्मक कारवायांसाठी उपयोग करण्यात बीड पोलिस दल पुन्हा एकदा राज्यात क्रमांक एकवर आले आहे.
महिला व बालकांवरील लैंगीक अत्याचाराच्या गुन्ह्यांची मुदतीत निर्गती करुन याबाबतची अभिलेखे सीसीटीएनएस प्रणालीवर अद्यायवत करण्याचे प्रमाण, सिटीझन पाोर्टलवरील तक्रारींचा मुदतीत निपटारा, दैनंदिन गुन्ह्यांचे एफआयआर ऑनलाइईन करणे आदी बाबींवरुन हे मूल्यांकन झाले. सीसीटीएनएस या प्रणालीच्या वापरात मागील महिन्यांच्या मुल्यांकनात राज्यात बीड जिल्हा पोलिस दल प्रथम आले आहे.
सहा वेळा राज्यात पहिला क्रमांक तर एकदा दुसरा दुसरा क्रमांक जिल्हा पोलिस दलाने पटकावला आहे. विशेष म्हणजे, पुणे येथील महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्यात या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बीड पोलिस दलाचा तत्कालीन पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा चषक देऊन गौरवही झाला होता.
आताही ५३ घटकांच्या मासिक कामगिरीचे मुल्यांकनात बीड पाोलिस दल प्रथम आले आहे. यासह आला. याच ‘सीसीटीएनएस’ प्रणालीअंतर्गत असलेल्या ‘आटीएसएस’ (इनव्हेस्टीगेशन ट्रॅकींग सिस्टीम फॉर सेक्सुअर ऑफेन्सेस) मध्ये महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची ६० दिवसांत निर्गती करण्याचे उद्दीष्ट देखील बीड जिल्हा पोलिस दलाने १०० टक्के पूर्ण केले आहे.
सीसीटीएनएस प्रणालीमधील अद्ययावत केलेल्या अभिलेख्यांचा वापर करुन चालू वर्षात ८१ गुन्हे उघडकीस येण्यासह अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासही याची मदत झालेली आहे. अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या अखत्यारित हा विभाग चालत असून जिल्हास्तरावर निलेश ठाकूर, मच्छिंद्र बीडकर, चंद्रसेन राऊत यावर काम करतात.
महिलांबाबत अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर याची नोंद आटीएसएस या पोर्टलवर होते. या गुन्ह्यांची निर्गती ६० दिवसांत अपेक्षित असते. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून ४५ दिवसानंतर अलर्ट मेसेज जनरेट होतो. तो पोलिस अधीक्षकांना पोचतो. पोलिस अधीक्षक है स्वतः तपासी अंमलदार यांना संपर्क करून गुन्हा मुदतीत निकाली काढण्याची सूचना देतात. त्यामुळे कारवाईला गती येते. जिल्ह्यात महिला अत्याचार संबंधाने दाखल ९५ गुह्यांची निर्गतिही १०० टक्के आहे.
सीसीटीएसन या प्रणालीच्या वापरात जिल्ह्याची सातत्याने चांगली कामगिरी राहिल्याने पुन्हा जिल्हा पोलिस दलाला पहिला क्रमांक मीळाला. जिल्हा पोलिस दलासाठी ही अभिमानाची बाब आहे. या प्रणालीच्या वापरामुळे गुन्हे प्रतिबंधासाठीही उपयोग होत आहे.
- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक, बीड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.