Murder: गल्हाटी नदीत सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, परिसरात एकच खळबळ

Pachod : साठलेल्या पाण्यावर पस्तीस ते चाळीस वयोगटातील पुरूषाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.
: गल्हाटी नदीत सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, परिसरात एकच खळबळ
MurderSakal
Updated on

Vardha: धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गल्हाटी नदीपात्रात साठलेल्या पाण्यावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना सापडून आल्याने सर्वत्र खळबळ उडून चर्चेस उधाण आल्याची घटना पाचोड खुर्द (ता.पैठण) परिसरात बुधवारी (ता.१७) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

यासंबंधी अधिक माहिती अशी, राष्ट्रीय महामार्गालगत पाचोड खूर्द शिवारातून वाहणाऱ्या गल्हाटीवर ठिकठिकाणी जलसंधारण योजनेंतर्गत बंधारे उभारून पाणी अडविण्यात आले आहे. प्रारंभी गेल्या महीन्यात झालेल्या पावसांत या नदीला पूर येऊन सर्वत्र बंधारे भरून आजपावेतो या बंधाऱ्याने पाणी साठवून ठेवले आहे.

बुधवारी (ता.१७) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाचोड खुर्द येथील काही यूवक प्रातःविधीला गल्हाटी नदीच्या पात्राकडे गेले असता त्यांना नदीच्या एका बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यावर पस्तीस ते चाळीस वयोगटातील पुरूषाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.

त्यांनी तातडीने गावांकडे धाव घेऊन पाचोड पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी माहिती मिळताच आपल्या सहकाऱ्या समवेत घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थ व सहकाऱ्यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ.आसाराम चौरे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

मृतदेह पूर्णतः कुजून त्याची दुर्गंधी सुटली होती. सदरील मृतदेहाची ओळख पटली नसल्याने हे मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रूग्णालयाच्या शवागृहात पाठविण्यात आले आहे.

या घटनेची पाचोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शना खाली बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे करीत आहेत.

सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे म्हणाले ,"गल्हाटी नदीत पुरुष जातीचा सापडलेला मृतदेह अज्ञात व्यक्तीचा असून त्याची सर्वत्र माहिती पाठवून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

सदरील घटना व त्याचे पायात असलेली चप्पल पाहता जो व्यक्ती मृत पावला तो काही कामानिमित्त नदीवर गेला असावा. यातून घातपात नसावा अशी कल्पना येते. तातडीने या घटनेचा उलगडा होईल. '

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.