औसा (जि.लातूर ) : सरकारी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. तेथील डॉक्टरांपासून ते सफाई कामगारापर्यंत रुग्णांच्या बाबतीत असलेल्या अनास्थेमुळे अनेकजण शासकीय रुग्णालायाकडे पाठ फिरवितात. मात्र औसा ग्रामीण रुग्णालयातील (Government Hospital) वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंगद जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे एका महिलेला व तिच्या बाळाला जीवदान मिळाले आहे. डॉक्टरांनी दाखवलेली समयसूचकता व योग्य निदानामुळे एका महिलेच्या पिशवीतील पूर्ण पाणी संपून बाळ आणि बाळंतिणीच्या जिवाला धोका निर्माण झाला असताना अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करुन एका गरीब कुटुंबाचे नुसते हजारो रुपये वाचविले नाहीत, तर बाळ बाळंतीण दोघांनाही सुखरुप वाचविले आहे. (Critical Delivery Successful, Mother Give Baby In Ausa Government Hospital Of Latur)
येथील नाथ संस्थानच्या सेवेत असणारे सेवेकरी विठोबा वैजवाडे यांची कन्या नेहा राहूल भावसार ही बाळंतपणासाठी औसा ग्रामीण रुग्णालयात २४ मार्च रोजी दाखल झाली होती. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिच्या पिशवीतील संपूर्ण पाणी संपले होते. त्यामुळे बाळ आणि बाळंतीण या दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. या रुग्णालयाचे वैद्यकीय (Medical) अधीक्षक डॉ. जाधव यांनी सर्व परिस्थितीचा अभ्यास करुन तातडीने शस्त्रक्रिया करुन बाळाला बाहेर काढणे गरजेचे असल्याच्या निष्कर्षा पर्यंत आले. अशा परिस्थितीत त्या गरोदर महिलेला लातुरलाही (Latur) पाठविता येत नव्हते कारण उशीर झाला तर धोका अधिक ओढवणार होता. त्यांनी तातडीने कामासाठी रुग्णालयात आलेले भुलतज्ज्ञ व सर्जरी करणाऱ्या त्यांच्याच पत्नी त्याही त्यावेळी औसा रुग्णालयात उपस्थित होत्या. या दोघांनाही डॉ. जाधव यांनी कामाला लावले. मुलीचे कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत असतांनाही 'मी या मुलीचा बाप असल्यासारखी काळजी घेतो तुम्ही घाबरुन जाऊ नका असा' असा धिर दिला. परिस्थितीची जाणीव ठेऊन डॉ. जाधव यांच्या पत्नी ज्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहेत त्यांनी तातडीने रुग्णाला ऑपरेशन कक्षात घेऊन त्यावर शस्त्रक्रिया केली व बाळाला सुखरुप बाहेर काढले. त्यामुळे बाळ आणि बाळंतिण दोघांच्याही जीविताचा धोका टळला. डॉ. अंगद जाधव यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे दोन जीव सुखरुप आहेत. त्यांना या कामासाठी आरोग्य सेवक बबन लोहार, परिचारीका वंदना ढाकणे व इतर कर्मचाऱ्यांनी मोलाची साथ दिली. सिझर करण्याची व्यवस्था नसतांनाही एका महिलेला आणि तिच्या बाळाला जीवदान देणाऱ्या डॉ. जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार औसा पालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनिल मिटकरी यांनी केला. ग्रामीण रुग्णालयाने दाखविलेल्या या माणुसकीची चर्चा पंचक्रोशीत सुरु आहे.
माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी डॉक्टर हे देवच
आणीबाणीच्या प्रसंगात येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केलेले कार्य हे माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी देवदुतापेक्षा कमी नाही. पिशवीतील पाणी संपल्याचे कळताच काळजात धस्स झाले होते. मात्र डॉ. अंगद जाधवांनी मला धीर दिला आणि शस्त्रक्रिया करुन बाळ व बाळंतीणीला सुखरुप वाचविले. त्यांचे ऋण मी कसे फेडू हे कळत नसल्याची प्रतिक्रिया मुलीचे वडील विठोबा वैजवाडे यांनी सकाळकडे दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.