Beed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक

अंबाजोगाई-कळंब रस्त्यावर चक्काजाम आंदोलन
beed
beed sakal
Updated on

केज : प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई मंजुरीच्या अधिसूचनेतून तालुक्यातील बनसारोळा, युसुफवडगाव, नांदूरघाट, विडा व आडस महसूल मंडळे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी तालुक्यात विविध ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वात शनिवारी (ता.२४) सकाळी नऊ वाजता अंबाजोगाई-कळंब रस्त्यावर सावळेश्वर (पैठण) येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील वगळलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीकविमा २५ टक्के अग्रिम व सोयाबीनवर पडलेल्या येलो मोझॅक रोगामुळे झालेल्या नुकसान भरपाई द्यावी या प्रमुख मागणीसाठी आंदोलकांनी शासन व पीकविमा कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अंबाजोगाई-कळंब रस्त्यावर सावळेश्वर (पैठण) येथे दोन तास चक्काजाम आंदोलन केले.

पुढील चार दिवसांत पीकविम्याच्या २५ टक्के अग्रिमपासून वगळण्यात आलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई मंजूर न केल्यास तीस सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या रूमणे मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन कुलदीप करपे यांनी यावेळी बोलताना केले. मंडळ अधिकारी उडते व तलाठी धुमाळ यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

या आंदोलनात डॉ. हनुमंत सौदागर, ओमप्रकाश रांजणकर, अतुल गवळी, शहराध्यक्ष फिरोज पठाण, प्रमोद पांचाळ, अशोक साखरे, बंडोपंत कुलकर्णी, डॉ. उत्तम खोडसे, बंडू चौधरी, सरपंच पिंटू मस्के, उपसरपंच अंकूश करपे, गौतम चौधरी, सरपंच रुस्तुम चौधरी, डॉ. शिवाजी मस्के, ॲड. सचिन चौधरी, उपसरपंच प्रमोद करपे, दिगंबर करपे, सुग्रीव करपे, संदीप भाकरे, श्रीधर भाकरे, मनोराम पवार, मंगेश शिंदे माजी सरपंच श्रीकृष्ण रानमारे यांच्यासह परिसरातील सावळेश्वर, पैठण, जवळबन, आणंदगाव, सारणी, पाथरा, नायगाव, लाडेगाव, कानडीबदन, औरंगपुर, बनसारोळा, ईस्थळ, आवसगाव, धनेगाव, आणेगाव, सोनिजवळा, भाटुंबा व वाकडी येथील शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.