लातूर : नैसर्गिक आपत्तीशी सामना कराव्या लागलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९चा पीक विमा मंजूर झाल्याने काहीसा आधार मिळाला आहे. सोयाबीनबरोबर मका, साळ, ज्वारी, बाजरी या पिकांसाठी जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख शेतकऱ्यांना ७०९ कोटी रुपयांचा पिक विमा मिळणार आहे.
दरम्यान, सरकारने कर्जमाफीची दुसरी यादीही शनिवारी (ता. २९) जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली आहे.
कधी दुष्काळ तर कधी अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कायम नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. खरीपाच्या पेरणीच्या वेळी पाऊस झालाच नाही. तरी शेतकऱ्यांनी कशीबशी पिके जगवली. ती हातातोंडाशी आलेली असताना काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने तडाखा दिल्याने अनेकांची पिके वाया गेली. त्यातच पीक विमा मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आधार मिळाला आहे.
अहमदपूर तालुक्यामधील ५९,७६२, औशातील ६०,३०६, चाकूरमधील ४५,२८८, देवणीमधील २६,७५७, जळकोटमधील २५,३१७, लातूरमधील ४७,७०८, निलंगा येथील ७६,३१०, रेणापूरमधील ३८,२३४, शिरूर अनंतपाळमधील २१,७११, उदगीरमधील ४९,४८१ शेतकऱ्यांना या पीकविम्याचा लाभ मिळाला आहे.
असा आहे पीक विमा
अहमदपूर : ६७ कोटी ४९ हजार
औसा : ९२ कोटी ५३ लाख
चाकूर : ७५ कोटी १ लाख
देवणी : ३३ कोटी ८ लाख
जळकोट : २५ कोटी ४४ लाख
लातूर : १२५ कोटी ४५ लाख
निलंगा : ८७ कोटी ७८ लाख
रेणापूर : १११ कोटी ८८ लाख
शिरूर अनंतपाळ : २८ कोटी २१ लाख
उदगीर : ६३ कोटी ३७ लाख
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सरकारने जाहीर केली आहे. या योजनेची दुसरी यादी शनिवारी जाहीर झाली. यात लातूर जिल्ह्यातील ५१ हजार ४४० शेतकरी पात्र ठरले आहे.
मात्र, जिल्ह्यातील काही गावांतील शेतकऱ्यांच्या याद्या अद्याप प्रसिद्ध झाल्या नाहीत. त्या उद्यापर्यंत जाहीर होतील. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.