Crop Loan: उस्मानाबाद जिल्ह्यात पीककर्जाचे अवघे २७ टक्के वाटप

खासगी बँकांना कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पण, गतवर्षीपेक्षा यंदा पीक वाटपात बॅंका मागे आहेत
crop loan
crop loancrop loan
Updated on

उस्मानाबाद: जिल्ह्यामध्ये पीककर्जाचे वाटप कासगवतीनेच सुरू आहे. खासगी बँकांनी आत्तापर्यंत उद्दिष्टांपैकी फक्त २७ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे. ९४३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना २५१ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण व जिल्हा बँकेतर्फे पन्नास टक्के एवढे पीककर्जाचे वाटप झाले आहे. मात्र, त्यात नवीन कर्जदार कमीच आहेत. शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत पीककर्जाची गरज असते. पण, यंदा कर्ज वाटपात बॅंकांनी हात अखडता घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या काळात शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.

खासगी बँकांना कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पण, गतवर्षीपेक्षा यंदा पीक वाटपात बॅंका मागे आहेत. जिल्ह्यातील व्यापारी बँकांसाठी यंदा ९४३ कोटीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी फक्त २५१ कोटींचेच वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण २७ टक्केच आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी बैठक घेऊन पीककर्जाचे वाटप करण्याच्या सूचना केल्या होत्या. या बैठकीनंतर काहीप्रमाणात कर्ज वाटपाचा टक्का वाढल्याचे दिसून येत आहे. किमान पन्नास टक्क्यांपर्यंत कर्जवाटप होणे आवश्यक होते. यंदा एकूण सरासरी कर्जवाटप ३५ टक्के झाले असले तरी त्यामध्ये जिल्हा बँकेचा वाटा ५६ टक्के एवढा आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वाटप ४१ टक्के आहे.

crop loan
नांदेडची वाटचाल बिहारकडे सुरु; गोळीबारने हादरतेय शहर

केवळ ७८ हजार ८९१ शेतकऱ्यांना लाभ
यंदा जिल्हा बँकेला शंभर कोटी रुपये कमी मिळाल्याने मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील ७८ हजार ८९१ शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये व्यापारी बँकेचे खातेदार २५ हजार १४०, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे दहा हजार ९२१ व जिल्हा बँकेचे १८ हजार १९४ एवढे आहेत. कर्ज वाटपामध्ये व्यापारी बँकाची नकारात्मक भूमिका पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.