शासकिय सेवा व योजनांच्या महामेळाव्यास गर्दी
नांदेड : नागरिकांकरिता सरकारकडून अनेक योजना व शासकिय सेवा उपलब्ध आहेत. परंतु त्या योजनांचा व सेवांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी केले.
विविध शासकिय योजनांची माहिती सामान्या जनतेला नसते. त्यामुळे ते योजनांपासुन वंचित राहतात. त्या योजनाचा फायदा नागरिकांना होत नाही यासाठीच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून या शासकिय योजनाच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी न्यायाधीश धोळकिया बोलत होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
रविवारी (ता. दोन) सकाळी दहा वाजता प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या महामेळाव्यास जिल्हा प्राधीकरणचे सचीव तथा न्यायाधीश राजेद्र रोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, तहसिलदार डॉ. अरुण जर्हाड, जिल्हा सरकारी वकील आशिष गोधमगांवकर, जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष मिलींद लाठकर, डॉ. झाकीर हुसेन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एम. झेड. सिद्दीकी यांची उपस्थिती होती.
हेही वाचा - नांदेडात प्रेमी युगलांना मारहाण करून लुटले
शासकिय योजनांच्या ३२ स्टाॅल
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध शासकिय योजनांच्या ३२ स्टाॅलचे उद्धाटन करण्यात आले. या महामेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय अंतर्गत येणा-या योजनांचे चार स्टाॅल होते. समाजकल्याणा विभागाअंतर्गत येणा-या योजनांचे तीन स्टाॅल, महानगरपालिकेअंतर्गत येणा-या योजनांचे तीन स्टाॅल, जिल्हा परिषदेकडे असणा-या योजनांचे पाच स्टाॅल, महिला आर्थिक विकास मंडळाचे तीन स्टाॅल, आरटीओ विभाग, एसटी महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, पशुसंवर्धन इत्यादी शासकिय कार्यालयाचे स्टाॅल लावण्यात आले होते.
सात हजारपेक्षा जास्त नागरिकांची महाशिबिरास भेट
यामध्ये तहसिल कार्यालयाच्या स्टाॅल वरती अडीच ते तीन हजार लोकांनी भेटी दिल्या. तहसिल कार्यालयाच्या रेशनकार्ड योजने अंतर्गत २१० जणांना रेशनकार्ड योजनेचा लाभ देण्यात आला. त्यामध्ये नविन राशनकार्ड काढणे, दुरुस्ती करणे, नाव कमी करणे अथवा वाढविणे इत्यादीचा लाभ देण्यात आला. १५ व्यक्तींना उत्पन्न प्रमाणपत्र देण्यात आले व २५ व्यक्तींना रहिवाशी दाखले देण्यात आले. तसेच २० ते २५ लोकांना मतदान ओळखपत्र योजनेचा लाभ देण्यात आला. वैशिष्टयपूर्ण बाब म्हणजे स्टाॅलचे उद्घाटन केल्यानंतर उद्घाटन सोहळा संपेपर्यंत तहसिल कार्यालयाने १० व्यक्तींना वेगवेगळ्या स्वरुपाचे दाखले अदा करण्यात आले.
येथे क्लिक करा - नांदेडात चौथीच्या मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग
आधार कार्ड योजनेचा प्रत्यक्ष लाभ
पोस्ट विभागाने ८० लोकांना आधार कार्ड योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. ६० लोकांना सुकन्या योजनेचा लाभ देण्यात आला. २० क्युआर कार्डचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. एसटी महामंडळाने २५ ते ३० जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड योजनेचा लाभ दिला. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत जिल्हा समन्वयक यांनी २५ ते ३० लोकांना गोल्डन कार्ड अदा केले. महानगरपालिका यांच्याकडून ३० ते ४० लोकांना विविध प्रकारचे दाखले अदा करण्यात आले.
कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ट्रॅक्टरचे वाटप
सदर महामेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत १० लाभाथ्र्यांना प्रत्यक्ष घरकुल वाटपाचा लाभ देण्यात आला. सिंचन विहिर योजने अंतर्गत पाच लाभाथ्र्यांना प्रत्यक्ष सिंचन विहिरीचे वाटप करण्यात आले. कृषी अधिकारी कार्यालयातर्फे कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. कामगार आयुक्त कार्यालया तर्फे १० लाभाथ्र्यांना सामुहिक रित्या सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. पोस्ट आॅफिस कार्यालयातर्फे डाक जिवन विमा पासबुक व पाॅलीसीचे तिन लाभाथ्र्यांना वाटप करण्यात आले. तसेच १० लाभाथ्र्यांना क्युआर कार्डचे वाटप करण्यात आले.
सदर महामेळाव्यात जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, शिधापत्रिका, रहिवाशी दाखले, यांचे लाभाथ्र्यांना तात्काळ वाटप करण्यात आले. आधार कार्ड दुरुस्ती, नविन आधार कार्ड देणे, शिधापत्रिका दुरुस्ती, सुकन्या योजना, एस.टी महामंडळाची स्मार्ट कार्ड योजना, रमाई घरकुल योजना, बचत गट, या सर्व योजनांचा नागरिकांनी लाभ घेतला.
हे उघडून तर पहा - वाहतुक नियमाचा भंग, बारा लाखाचा दंड
न्यायाधीश रोटे यांनीही दिली माहिती
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी महाशिबिरात लावण्यात आलेल्या स्टाॅल व योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच सदर महामेळाव्यासाठी येणा-या गरजुंनी मिळणा-या प्रत्यक्ष लाभाचा लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश पत्रकार, विधीज्ञ, सर्व शासकिय कार्यलयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महामेळाव्याचे सुत्रसंचालन न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) सचिन पाटील यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.