Beed Crime News: शासकीय जमिनीत गांजाची लागवड; 57 लाखांचा साडेपाच क्विंटल गांजा जप्त

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील बनसारोळा येथील शासकीय गायरान जमिनीत हा गैरप्रकार सुरु होता. या जमिनीत पारधी समाजाची लोकवस्ती आहे. या वस्तीलगत गांजाची लागवड करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.
Beed Crime News: शासकीय जमिनीत गांजाची लागवड; 57 लाखांचा साडेपाच क्विंटल गांजा जप्त
Updated on

केज: शासकीय गायरान जमिनीत गांजाची लागवड केल्याच्या ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह युसुफवडगाव पोलिसांनी शुक्रवारी (ता.०८) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलीसांनी गांजाची झाडे उपटून सत्तावन्न लाख नव्वद हजार रुपये किंमतीचा पाचशे पन्नास किलो गांजा ताब्यात घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.