आज जागतिक कला दिन : लोककलावंतावर ‘कोरोना’चे संकट

file photo
file photo
Updated on

परभणी : भिमजयंतीमुळे दरवर्षी विविध भजनी मंडळ व आॕर्केस्ट्राच्या माध्यमातून उपजिवीका भागवली जायची. परंतु यंदा कोरोनामुळे या कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. ज्यांचे करार झाले होते, त्यांनीही ते मोडून पैसे परत घेतले. एरवी लोककला क्षेत्रातही लाखों रुपयांची उलाढाल होते. यामधून हजारो लोककलावंतांना वर्षभराचा रोजगार उपलब्ध होतो. मात्र, यंदा ‘कोरोना’ आला आणि सर्व यात्रा व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घासदेखील गेल्याची भावना लोककला क्षेत्रातील मंडळींमध्ये व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका, नंतर अवकाळी पावसाचा फटका आणि आता ‘कोरोना’ने सर्वत्र ‘लॉकडाऊन’ असल्याने रद्द झालेले सांस्कृतिक उत्सव यामुळे लोककलावंतांच्या रोजगारावर गंडांतर आले आहे. त्यातच लोककलावंतांना सरकारकडून मिळणारे मानधन गेल्या तीन महिन्यांपासून रखडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात जवळपास ३५ हजार लोककलावंतांना राज्य सरकारतर्फे प्रत्येक महिन्याला मानधन दिले जाते. त्यामध्ये अ, ब आणि क अशी वर्गवारी करण्यात आली आहे. अनुक्रमे ३ हजार १५०, २ हजार ५०० आणि १ हजार ७५० इतके मासिक मानधन मिळते. मात्र, यंदा जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही.

खात्यात मानधन जमा करावे
मानधन मिळत असलेल्या लोककलावंतांमध्ये पिंगळा, भारुड, तमाशा, नाटक व भिमगीत गायन व वादक अशा विविध प्रकारच्या कला सादर करणाऱ्या कलाकारांचा समावेश आहे. त्यातील अनेक जण वृद्ध आहेत. अनेकांना दवाखाना तसेच औषधांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे कलाकारांचे मानधन लवकरात लवकर जमा करावे, अशी मागणी होत आहे. याबाबतचे निवेदन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना पाठविण्यात आले आहे. अर्थ विभागाकडून तातडीने लोककलावंतांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.