Dasra 2022 : जालन्यात ७५ फूट रावणाचे दहन

नयनरम्य आतषबाजी, जालनेकरांची गर्दी
Ravan Dahan
Ravan Dahanesakal
Updated on

जालना : कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा दसऱ्या महोत्सव समितीच्या वतीने विजयादशमीच्या मुहूर्तावर बुधवारी (ता.पाच) रात्री स्वातंत्र्याचा ७५ व्या वर्षाचे औचित्य साधून नयनरम्य आतषबाजीसह ७५ फुटी रावणाचे दहन केले. हा रावण दहन कार्यक्रम जे.ई.एस. कॉलेज प्रांगणात पर पडला. यावेळी हजारो जालनेकर उपस्थित होते.

कार्यक्रमास माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, जेईएस महाविद्यालयाचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, माजी आमदार अरविंद चव्हाण, भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, उद्योजक घनश्यामदास गोयल, गणेश फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश राऊत, दशहरा महोत्सव समितीचे संजय दाड, विनीत साहनी, दिलीप शाह, बंकट खंडेलवाल, अर्जुन गेही, गेंदालाल झुंगे, अनिल सोनी, अनिल पंच, विरेंद्र धोका, मनीष तवरावाला आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार टोपे यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. त्यानंतर संगमनेर येथील जमीर फायर वर्क्सची आधुनिक आणि नयनरम्य आतषबाजी अनुभवायला मिळाली. मल्टी कलरमध्ये बोंझा, क्रॅक्लिंग कोकोनट, सिल्वर स्नेक, चायना टेक्निक, सिल्वर ड्रम, गोल्डन बझुका, मॅजिक हिपहॉप, टायटॅनिक, टायटॅनिक ग्रीन, साऊंड ग्राउंड आयटममध्ये अम्ब्रेला शॉवर, स्टार व्हील, सिल्वर रेन, थ्री व्हील, क्रॅकलिंग नायगारा हॉट फॉल, कोकोनट ट्री, फाईव्ह ट्री व्हील, सनरीच, गोल्डन स्टार व्हील, गोल्डन ट्री व्हील, वेलकम नेमप्लेटमध्ये वेलकम, स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव या प्रकारची नयनरम्य आतषबाजी जालनेकरांचे लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.