जातेगाव( जि.बीड) - सासरच्या जाचास कंटाळून एका विवाहित महिलेने रवीवारी(ता १४)रात्री कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना जोडवाडी येथे घडली. या घटनेनंतर मृत महिलेच्या सासूचाही पहाटे मृत्यु झाला.
चकलांबा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. मृत सासूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणण्यात आला होता. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
प्रतिक्षा संदिप कोकाटे (वय २४ ) या महिलेचे गेल्या काही वर्षापुर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही महिन्याने सासरच्या मंडळीकडून तिचा छळ सुरु झाला. सासरच्यांनी मारहाण केली असल्याचे सांगण्यात आले. या मारहाणीमुळे सदरील महिलेने रविवारी रात्री कीटकनाशक औषध घेतले.याची माहीती कुटुंबीयास होताच प्रतिक्षाला बीड जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रात्री उपचार चालु असताना सुन प्रतिक्षा कोकाटे हिचा मृत्यू झाला.
घटनेनंतर मृत प्रतिक्षा कोकाटे हिची सासू कोंताबाई कोकाटे यांचा आज पहाटे मृत्यु झाला. हदयविकाराच्या झटक्याने कोंताबाई यांचा मृत्यु झाला असावा असा अंदाज पोलीसांकडून व्यक्त केला.
चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी जावून पचंनामा केला व कोंताबाई कोकाटे मृतदेह शवविच्छेदनासाठी मादळमोहिच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला होता. प्रतिक्षा कोकाटे हिच्या आत्महत्या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.