ईस्लापूर (जिल्हा नांदेड) : दोन बिबट्यांच्या मृतदेहा पाठोपाठ एका कुत्र्याचाही मृतदेह घटनास्थळी आढळून आल्याने या प्राण्यावर विष प्रयोग झाला की काय? अशी शंका निर्माण होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एस. एच. वाजे व प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी संबधित वनपरिक्षेत्र अधिका-यांना दिले आहेत.
किनवट तालुक्यातील जलधारा येथील वन विकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणा-या कक्ष क्रं. २६३ झळकवाडी (ता. किनवट) या गावात शेजारी असलेल्या राखीव जंगला शेजारी असलेल्या माधव पुंजाजी झळके यांच्या शेतात गुरवारी (ता. १६) रोजी एक तर शनिवारी (ता. १८) रोजी असे तीन दिवसात दोन बिबट्यांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना उघडकीस आल्याने वन विभाग खडबडून जागे झाले.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट
घटनेची गंभिरता लक्षात घेउन वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एस. एच. वाजे, नांदेड प्रादेशिक वन विभागाचे आशिष ठाकरे, सहाय्यक व्यवस्थापक जे. डी. पराड, वनपरिक्षेत्र अधिकारी एम. डी. गिते, आरोहित चोबे, प्रकाश शिंदे यांनी तातडीने घटनस्थळी भेट दिली. दोन बिबट्यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी एका कुत्र्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
तपासणीसाठी अवशेष नागपूर येथील वैज्ञानिक न्याय सहाय्य प्रयोगशाळा
वनविभागाच्या वतीने पंचनामा करण्यात येउन या सर्वासमक्ष बिबट्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणाची माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मृत्तदेहाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील वैज्ञानिक न्याय सहाय्य प्रयोग शाळा येथे पाठवण्यात आल्याची माहिती परिक्षेत्र अधिकारी एम. डी. गीते यांनी सांगितले आहे.
हे उघडून तर पहा - Video : काेराेना व्हायरसची साखळी ताेडायची...तर वाढवा प्रतिकारशक्ती
दोन बिबट्यासह एका कुत्र्याचा मृतदेहाने खळबळ
एम. डी. गीते यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात ईसमाविरुध्द भारतीय वन अधिनियमन १९२७ व भारतीय वन्यजीव (सरंक्षण) कायदा १९७२ नुसार इस्लापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन बिबट्या बरोबर एका कुत्र्याचे प्रेत आढळून आल्याने या प्राण्यांवर विष प्रयोग करण्यात आला असावा? असा संशय बळावल्याने या प्रकरणी शेतक-यांना व गावच्या नागरिकांना विश्वासात घेउन सखोल चौकशी करण्यात यावी असे आदेश नांदेड वनविभागाचे उपवनसरंक्षक आशिष ठाकरे यांनी आप्पारावपेठचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरोहित चोबे, ईस्लापूरचे प्रकाश शिन्दे व जलधाराचे एम. डी. गीते यांना दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.