देगलूरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा- कृती समिती

फोटो
फोटो
Updated on

देगलूर (जिल्हा नांदेड) : राज्यात नवे २२ जिल्हे आणि ४९ तालुके निर्मितीचा प्रस्ताव आहे. मोठमोठ्या जिल्ह्यांचे विभाजन, त्रिभाजन करुन हे नवे जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळात २०१८ मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. वित्त, महसूल, नियोजन विभागाचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते. या समितीने महाराष्ट्रात नवे २२ जिल्हे आणि ४९ नवे तालुके असा प्रस्ताव या समितीसमोर होते.

आता लातूर जिल्ह्यातील उदगीरला जिल्हा निर्मिती होऊन देगलूर उदगीरमध्ये समाविष्ट होणार असल्याचे वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसारीत होताच तालुक्यातील सामजिक कार्यकर्त्ये व नागरिकांत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागला आहेत. येथील निष्क्रीय लोकप्रतिनिधी संतापजनक गप्प असल्याने त्यांच्यावरही रोष व्यक्त केला जात आहे. देगलूरच जिल्हा झाला पाहिजे यासाठी रविवारी (ता. दोन) गांधी चौक येथे जाहीर चिंतन सभा घेण्यात येऊन या मागणीसाठी प्रसंगी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

कृती समिती स्थापन करून लढा देण्याचा निर्णय

देगलूरचे नाव कोणत्याही प्रस्तावित जिल्ह्याला न जोडता देगलूरलाच स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी सर्व पक्षांचे नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, सर्व स्तरांतील पदाधिकारी, सामजिक कार्यकर्ते यांच्या वतीने चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देगलूर जिल्हा झाला पाहिजे, यासाठी वेगळी कृती समिती स्थापन करून लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यांची होती उपस्थिती 

या वेळी भाजपचे राठोड स्वच्छता जागर ग्रुपचे सत्यनारायण नागोरी, विजय यन्नावार, नगरसेवक शैलेश उल्लेवार, अशोक कांबळे, जयदीप वरखिंडे, विश्व परिवाराचे कैलास येसगे, ॲड. सूर्यवंशी, मनसेचे प्रवीण मंगनाळे, विकास नरबागे, खंडेराव गवलवाड, बालाजी मैलागिरे, श्रीनिवास उल्लेवार, चंदू अक्यमवार, योगेश जाकरे, बाबाखान, आदित्य बनसोडे, योगेश सातेलीवर, मारोती शिरगिरे, गंगाधर वाघमारे, हणमंत पंदिलवार, किरण काब्दे, सुगत केरूरकर, शेख सैफुल्ल, श्याम वद्येवार, प्रकाश गवलवाड, माधव तेलंगे, घाळप्पा आंबेसंगे, गंगाधर दाऊलवार, मल्लिकार्जुन हनुमाने, सचिन चव्हाण, सुदर्शन श्रीवास्तव, परमेश्वर भंडरवार, तुकाराम कोकणे, हबीब रहेमान, जावेद भाई, शेख असलम यांच्यासह इतर प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.

मागण्याचे निवेदन
याप्रसंगी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना देगलूरचे सर्वपक्षीय कृती समितीचे शिष्टमंडळ भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणार आहे.
अशोक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, देगलूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.