पारध (जि.जालना) - येथील सीताफळाला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येथून गुजरात राज्यासह मुंबई, अकोला; तसेच विदर्भातील बाजारपेठेत पाठविण्यात आलेल्या सीताफळाला चांगली मागणी आहे.
भोकरदन तालुक्यातील पारध परिसरातून दररोज साधारणपणे सहा टन सीताफळ विक्रीसाठी पाठविले जात आहेत, अशी माहिती फळ व्यापारी शेख साबेर, शेख आबेद यांनी दिली. पारध परिसरात नेहमीच्या पिकांबरोबरच शेतकरी आता फळबागांकडे वळत असल्याचे चित्र आहे. परिसरातील व्यापारी गेल्या पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांचा माल घेऊन थेट गुजरात, मुंबई, अकोला विक्रीसाठी नेतात. दररोज साडेतीनशे, चारशे कॅरेट सीताफळ माल जमा होतो. एका कॅरेटमध्ये पंधरा ते वीस किलो सीताफळ बसतात. यातून एक, दीड लाख रुपये उत्पन्न मिळते. बालानगर, हनुमान या वाणांचे सीताफळ गोड असल्यामुळे त्याला चांगली मागणी असल्याचे शेख आबेद यांनी सांगितले. सीताफळ झाडावरून काढण्यासाठी दररोज वीस-पंचवीस मजूर लागतात.
यंदाच्या पावसामुळे फळबागांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, त्यामुळे उत्पादनात घट येते आहे.
- शेख आबेद, फळ व्यापारी
ग्रामीण भागात फळबागा मोठ्या असतानाही फळांवर प्रक्रिया उद्योग उभारण्याबाबत पावले उचलली जात नाहीत. मोठ्या शहरांत शेतकऱ्यांना फळ विक्रीसाठी नेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे किमान तालुक्याच्या ठिकाणी फळ प्रक्रिया उद्योग उभारले जावेत.
- सुखदेव भुते,
शेतकरी, पारध
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.