पारध - मतदारांनी मतदान यादीतून नाव वगळण्यासाठी मागणी केलेली नसतांनाही अचानकपणे नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी फॉर्म नंबर 7 द्वारे बिएलओला मागणी आल्याने भोकरदन-जाफ्राबाद मतदार संघात सर्वत्र गोंधळ उडाला आहे. संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी आमदार चंदकांत दानवे यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे.