मोबाईलच्या बॅटरीला डिटोनेटर जोडल्याने मोठा स्फोट, दोन मुले गंभीर जखमी

परभणीतील स्फोटात एकाच्या डाव्या हाताची पाचही बोटे व उजवा डोळा निकामी, तर दुसऱ्याच्या डाव्या डोळ्यावरील भागाला खोलवर इजा झाली आहे.
Detonator Explosion In Parbhani
Detonator Explosion In Parbhani esakal
Updated on

जिंतूर (जि.परभणी) : शेतातील आखाड्यावर राहणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या बॅटरीला डिटोनेटरचे कनेक्शन लावल्याने मोठा स्फोट होऊन दोघे जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.१३) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की, जिंतूर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जालना रस्त्यावरील शेख सलीम यांच्या आखाड्यावर शाहिद पठाण सालगडी म्हणून राहतात. त्यांचा मुलगा अमन शाहिदखाँ पठाण (वय १३ ) व शेख असलम शेख अब्दुल ( वय १०) हे दोघे व जालना रस्त्यावर असलेल्या वाॅशिंग सेंटर जवळ खेळत होती. (Detonator Explosion In Jintur Of Parbhani District)

Detonator Explosion In Parbhani
सदावर्ते यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला भाजप देणार ५० हजारांचे बक्षीस

याच वाशिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या एका गोदामाजवळ त्यांना ब्लास्टिंगसाठी जिलेटिनच्या काड्यांना उडवण्यासाठी डिटोनेटरचा संच पडलेला दिसला. या मुलांनी आपल्याजवळ असलेल्या मोबाईलची बॅटरी काढून त्याचे कनेक्शन डिटोनेटर (Detonator) लावले. त्यामुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटात अमन शाहिदखाँ पठाण याच्या डाव्या हाताची पाचही बोटे व उजवा डोळा निकामी झाला. तर शेख असलम शेख अब्दुल याच्या डाव्या डोळ्यावरील भागाला खोलवर इजा झाली.

Detonator Explosion In Parbhani
मांस निर्यातीवर बंदी नाही,कारण डाॅलर मिळतात; ओवैसींची मोदीं सरकारवर टीका

स्फोटानंतर संबंधित मुलांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना परभणी (Parbhani) येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. वाढती उष्णता व मोबाईल बॅटरीचा केलेला अयोग्य वापरामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.