..या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रडारवर!  

file photo
file photo
Updated on

नांदेड : माळेगाव यात्रा उत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्हा परिषदे अंतर्गत पंचायत समिती लोहामार्फत गुरुवारी (ता.२६) कुस्त्यांची दंगल हा नियोजित कार्यक्रम झाला. दरम्यान, निमंत्रण पत्रिकेमधील पदनामाप्रमाणे प्रोटोकॉल न पाळण्याचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी लोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. 

जिल्हा परिषदेच्या लोहा पंचायत समिती अंतर्गत माळेगाव यात्रा उत्सवामध्ये गुरुवारी कुस्त्यांचा फड रंगला. दरम्यान, जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या निमंत्रण पत्रिकेनुसार उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष ठरविण्यात आले होते. त्यानुसार आमदार श्यामसुंदर शिंदे यांची उद्दघाटक तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली होती. त्यानुसार दुपारी २:३० च्या दरम्यान आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाच्या उद्दघाटनाचा कार्यक्रम सुरु असताना भाजपचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पवार यांनी विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची वाट पाहण्याची सूचना देत घोषणाबाजी केली. त्यावरुन आमदार श्यामसुंदर शिंदे आणि तालुकाध्यक्ष शरद पवार यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. 

सत्कारासाठी डावलल्याचा आरोप
खासदार प्रताप पाटील चिखलीकर काही वेळात कायक्रमस्थळी उपस्थित झाले आणि उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर उपस्थित मान्यवर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर स्थानापन्न झाले. यामध्ये खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, माधवराव जवळगावकर पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष समाधान जाधव, राज्य कुस्तीगीर असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. मोहिते पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे, लोहा पंचायत समितीचे सभापती सतिष उमरेकर आदींच्या उपस्थितीत सत्कारासाठी प्रमुखांना डावलल्याचा आरोप आमदार श्यामसुंदर शिंदे, उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी केला.  

तडकाफडकी बैठकीमध्ये कारवाईच्या सूचना 
उपस्थित मान्यवरांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक यांचा सत्कार डावलल्याचा आरोप करत आमदार श्यामसुंदर शिंदे, अध्यक्ष समाधान जाधव, आमदार माधवराव जवळगावकर पाटील, सभापती माधवराव मिसाळे यांनी आयोजन समितीवर संताप व्यक्त करत व्यासपीठावरुन काढता पाय घेत थेट जिल्हा परिषदेचे माळेगाव यात्रा येथील विश्रामगृह गाठले. उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी लोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रभाकर पांजेवाड यांच्यावर प्रोटोकॉल न पाळण्याचा ठपका ठेवून संताप व्यक्त केला. दरम्यान, घडल्या प्रकारामुळे संतप्त आमदार श्यामसुंदर शिंदे, उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी विश्रामगृहामध्ये तडकाफडकी बैठकी बोलावून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांच्याकडे दोषींवर कारवाईची मागणी केली. 

सुचक वक्तव्य

कुस्तीच्या फडात रंगलेल्या मान-पान नाट्यावर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माध्यमांसमोर येवून मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे. खंडोबाचा भक्त असल्याने श्रद्धापायी मी यात्रा उत्सवात सहभागी होत असतो. सत्ता आज असली तरी उद्याचा भरोसा नाही. त्यामुळे यात्रा उत्सवामध्ये कोणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करु नये, घडल्या प्रकाराची कसलीही कल्पना नाही मात्र, असे काही घडले असेल तर ते निंदनिय असल्याचे सुचक वक्तव्य त्यांनी केले.   

दोषींवर कारवाई निश्चित 
जिल्हा परिषद यंत्रणा माळेगाव यात्रा उत्सवामध्ये व्यस्त असल्याने दोषींवर करवाई प्रक्रियेस विलंब होत आहे. मात्र, यात्रास्थळी कुस्तीच्या फडात घडलेल्या प्रकारासंदर्भात दोषींवर करावाईच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांना देण्यात आल्या आहेत. सोमवारी (ता.३०) रोजी गटविकास अधिकारी लोहा यांच्यावर कारवाई निश्चित आहे. 
- समाधान जाधव (उपाध्यक्ष जिल्हा परिषद) 

अद्याप कारवाई नाही 
माळेगाव यात्रा येथील कुस्तीच्या फडातील प्रकाराबद्दल अद्याप कोणतीही कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली नाही. वेळप्रसंगी चौकशीअंती ठरवण्यात येईल. -शरद कुलकर्णी ( मुख्य कार्यकारी अधिकारी) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.