बीड : धनंजय मुंडे राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री, तर पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. दोघांचीही राजकीय पार्श्वभूमी भक्कम आणि सध्याही मोठ्या पदांवर असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक यश - अपयश व आरोप - प्रत्यारोपांचा तिर हा मुंडे भावंडांकडेच असतो. तसे, आज लागलेल्या निकालाच्या यश - अपयशाचे आकडे या दोघांच्या ताळेबंदात टाकले जाऊ लागले आहेत. मात्र, दोघांनी प्रचार केला असला तरी खरी ताकद व प्रतिष्ठा ही स्थानिक पातळीवर लागलेली होती. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कन्या असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) त्यांच्या राजकीय वारसदार देखील आहेत. मुंडेंच्या पश्चात त्यांनी भाजपमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केले. जिल्ह्यातील भाजपच्या प्रत्येक (Beed) हालचाली (उदा. विधानसभा, जिल्हा परिषद व अशा मोठ्या निवडणुकीत उमेदवारी व पक्षाचे पद कोणाला द्यायचे) यावर पंकजा मुंडे यांचेच नियंत्रण आहे. तर, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही पक्षांतरानंतर विरोधी पक्षनेते म्हणून काम करत राज्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली.(Dhananjay Mund Pankaja Munde Shadow On Five Nagarpanchayats Election Result Of Beed District)
विधानसभेला मोठ्या विजयानंतर त्यांना पक्षाने सामाजिक न्याय व विशेष साहाय्य या खात्याचे मंत्रीपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले. मात्र, पंकजा मुंडेंना भाजपमध्ये जेवढे अधिकार तेवढे धनंजय मुंडेंना मात्र मर्यादीत आहेत. कारण, सर्व नेत्यांची स्वतंत्र संस्थाने असल्याने त्यांची थेट पवारांजवळ उठबस असते. मात्र, निवडणुकींच्या प्रचारासाठी प्रमुख नेते म्हणून संबंधित पक्ष दोघांनाही सभांना बोलवितात. बॅनरवर मोठे फोटोही याच दोघांचे असतात. तसे, दोन्ही नेत्यांची राज्यात ओळख. परिणामी जिल्ह्यात सत्तेबाबत काही असेल तर धनंजय मुंडे व विरोधी भाजपबाबत काही असेल तर पंकजा मुंडे यांच्या खात्यावर जमा होते. आता या निकालाच्या विश्लेषणाकडे वळूयात. जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा (NCP) पाडाव झाला हे तेवढेच खरे. पण, यातली एकही निवडणुक वरील नेत्यांच्या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातली नव्हती. आता भाजपने आष्टी, पाटोदा व शिरुर कासार या नगरपंचायती जिंकल्या. या ठिकाणी स्थानिक पातळीवर सुरेश धस (Suresh Dhas) विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे (Balasaheb Ajabe) व राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख असा सामना रंगला.
भाजपच्या माजी आमदार धोंडेंनी धसांना साथ दिली. पक्ष म्हणून पंकजा मुंडे मागे उभे होत्याच. मात्र, मागच्या वेळी भाजपची सत्ता असताना व पंकजा मुंडे पालकमंत्री असताना त्यावेळी सुरेश धस राष्ट्रवादीत होते. त्यावेळी या तीनही नगरपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या आणि धसांच्या पक्षांतरानंतर भाजपचा झेंडा फडकला होता. वडवणीत आमदार प्रकाश सोळंके यांनी सत्तांतर करण्यासाठी इतर पक्षीय नेत्यांना सोबत घेऊन संपूर्ण ताकद लावली आणि त्याला यशही मिळाले. केजमध्ये भाजपचा आमदार असताना पक्षाचे चिन्ह नव्हते. पण, जनविकास आघाडीची मोटबांधणी आणि त्याला पाठबळ रमेश आडसकर यांनी दिले. आघाडीने सर्वाधिक आठ जागा जिंकल्या आहेत. इथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडी अशी तिरंगी लढत झाली. खासदार रजनी पाटील (MP Rajani Patil) यांचे होमपिच असतानाही पक्षाची मोठी पिछाडी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे (Bajarang Sonwane) यांनी केले. पण, पक्षाला इथेही फारसे यश मिळविता आलेले नाही. एकंदरीतच दोघेही पक्षांचे मोठे व प्रमुख नेत्यांपैकी आहेत. पण, या निवडणुकांत एकमेकांना टक्कर देतात ते मतदारसंघ वा शहरात नेतृत्व करणारे नेतेच. (Kaij, Ashti, Shirur Kasar, Wadawani And Patoda Nagarpanchayat Elections)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.