Pankaja Munde Dasara Melava : दसरा मेळावा अन् पंकजा मुंडे... वारशाबद्दल धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Dasara Melava 2024 Bhagwangad : भाजपच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे दोन नेते आज भागवनगडावर दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले.
pankaja dhananjay munde
pankaja dhananjay munde esakal
Updated on

भाजपच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे दोन नेते आज भागवनगडावर दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले. तब्बल १२ वर्षांनंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात दोन्ही नेते एकत्र आले. या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी नाव न घेता नारायण गडावरील मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यावर निशाणा साधला.

धनंजय मुंडे म्हणाले की, "या विचारांच्या दसरा मेळाव्यात अनेक वेळा संकटाच्या काळात स्वर्गीय मुंडे साहेबांपासून पंकजा ताईपर्यंत... आज १२ वर्षांच्या तपानंतर या दसरा मेळाव्याच्या माझ्या बहीणीच्या आणि परंपरेच्या पाठीशी उभं राहण्यासाठी मी इथे आलो आहे. ताई तुम्ही अनेक संघर्षातून हा मेळावा केला. मी तुमचे आभार आणि अभिनंदन करतो की, तुम्ही कुठल्याही संकटाला घाबरला नाहीत. सोबत कोण आहे कोण नाही हे पाहिलं नाही. पण समोरची ही मायबाप जनता सोबत आहे, त्यांचे आशीर्वाग आहेत.... पण मी एक नक्कीच केलं, भलं आपलं मधले १२ वर्ष जमलं नसेल पण मी कधी वेगळा दसरा मेळावा करायचं मनात देखील आणलं नाही. कारण जो वारसा ज्याला दिलाय त्याने तो...."

pankaja dhananjay munde
Pankaja Munde: दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंकडून लक्ष्मण हाकेंचा "गोंडस लेकरू" म्हणून उल्लेख

"आज मला जेवढा आनंद होतोय, पंकजा ताईंना जेवढा आनंद होतोय त्यापेक्षा जास्त आनंद मी तुमच्या डोळ्यात पाहायतोय….इथे आलेला समुदाय आणि बघत असलेला समुदाय सर्वजर एकसंघ झाला तर या पवित्र दसरा मेळाव्याची एखादा नवीन मेळावा चालू करून कोणीही पवित्रता संपवू शकत नाही. ही ताकद पंकजा ताईंमध्ये आहे", असेही धनंजय मुंडे म्हणाले.

pankaja dhananjay munde
Uddhav Thackeray Dasra Melava: दसरा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील 'हे' रस्ते असणार बंद!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.