Maharashtra Politics: धनंजय मुंडे- पंकजा मुंडे आज एकाच व्यासपीठावर; CM शिंदे, अजित पवार, फडणवीसांचीही उपस्थिती, काय आहे कारण?

बीड जिल्ह्यातील परळी येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत.
Pankaja Munde
Pankaja Munde Esakal
Updated on

आज बीड जिल्ह्यातील परळी येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे या देखील उपस्थित राहणार असल्यामुळे मुंडे भाऊ -बहीण एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.

राज्यातील सत्ता बदलानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. विशेष म्हणजे परळी मतदारसंघात हा कार्यक्रम होणार असल्याने या कार्यक्रमात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बीड जिल्हातील परळी शहरात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे शहरात मोठमोठे बॅनर्स, फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

Pankaja Munde
Weather Update: राज्यातील 'या' भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी दीड वाजता नांदेड विमानतळावर येणार आहेत. त्यानंतर ते विमानतळावरुन हेलिकॉप्टरने परळीला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात २२ हजार लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

Pankaja Munde
Chennai Rain : चेन्नईत मुसळधार पावसाचे थैमान! २०१५ च्या पुनरावृत्तीची भीती, थरारक Video व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()